Chandrakant Patil: डिसेंबरपर्यंत अनुकंपा तत्त्वावरील सर्व भरती करणार; उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांची ग्वाही
Amravati University: अमरावती विद्यापीठात मृत कर्मचाऱ्यांच्या नातेवाइकांना अनुकंपा तत्वावर नियुक्ती आदेश देण्यात आले. डॉ. अनिता पाटील यांच्या किडनी स्टोनवरील औषधास पेटेन्ट मिळाले असून त्याचे व्यावसायिकीकरणही करण्यात आले आहे.
अमरावती : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलेल्या सहमतीनुसार डिसेंबरपर्यंत अनुकंपा तत्त्वावरील सर्व नियुक्त्या पूर्णपणे करण्यात येणार असल्याचे उच्च व तंत्र शिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील यांनी शुक्रवारी (ता.२५) रोजी सांगितले.