Amravati University : विद्यापीठाच्या उन्हाळी परीक्षांच्या वेळापत्रकात बदल

विद्यार्थ्यांनी नोंद घेण्याचे अमरावती विद्यापीठाचे आवाहन
Amravati University
Amravati University esakal

अमरावती ः अमरावती विद्यापीठाच्या काही उन्हाळी २०२४ परीक्षांच्या वेळापत्रकात बदल करण्यात आला आहे. याबाबत सर्व महाविद्यालयांना कळविण्यात आले आहे. विद्यार्थ्यांनी याची नोंद घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

Amravati University
Nashik Crime News : मुख्य संशयित वैभव लहामगेला ठाण्यातून अटक! कुस्तीपटू लहामगे खुन प्रकरण

बी. आर्च. सेमी-८ (सी.जी.एस.), बी.ए. सेमि. १ (सी.बी.सी.एस.), एम. ए. (जर्नालिझम अॅंड मास कम्युनिकेशन) सेमि.-४ (सी.बी.सी.एस.) (रिवाईज्ड), बी.एस्सी. सेमि. १ (सी.बी.सी.एस.) एम.पी.एड्. सेमि.- ४ (नवीन), बी.पी.एड्. अॅंड एम.पी.एड्. सेमि.- १ व २ (नवीन), पी. जी., डिप्लोमा इन नॅचरोपॅथी अॅंड योगिक सायन्स सेमि.-२ (एन.ई.पी.), बी. ई. सेमि.-१ व २ आणि बी.टेक. सेमि.- १ (इंजि. सी.जी.एस.), बी. ई. सेमि.-४ (आय.टी. अॅन्ड एक्स्टेंशन) (सी.जी.एस.) आणि एम. एस्सी. (अप्लाईड इलेक्ट्रॉनिक्स) (सी.बी.सी.एस.- नवीन) एस-४ या परीक्षांच्या वेळापत्रकात बदल करण्यात आला.

दुरुस्ती/सुधारित/नवीन वेळापत्रक विद्यापीठाच्या संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आले आहे. यासंदर्भात सर्वसंबंधित महाविद्यालयांना परीक्षा विभागाकडून कळविण्यात आले असून महाविद्यालयांनी तातडीने आपल्या विद्यार्थ्यांना कळवायचे आहे. तरी विद्यार्थ्यांनी याची नोंद घ्यावी, असे आवाहन परीक्षा व मूल्यमापन मंडळाच्या प्रभारी संचालक मोनाली तोटे यांनी केले आहे. अधिक माहितीकरीता त्यांच्याशी ९७६३८३३९६९ या क्रमांकावर संपर्क साधता येईल, असे आवाहन विद्यापीठाच्या वतीने करण्यात आले आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com