

Bamboo Garden Amravati
sakal
अमरावती : बांबूच्या तब्बल ७५ प्रजातींचे जतन व संवर्धन करणारे अमरावतीच्या वडाळी वनपरिक्षेत्रातील बांबू उद्यान देशातील अशाप्रकारचे एकमेव उद्यान ठरले आहे. देशात एवढ्या मोठ्या प्रमाणात विविध प्रजातीचे बांबू एकाच ठिकाणी कुठेही आढळून येत नाहीत. यात देशी बांबूंसह विदेशातील बांबूंची सुद्धा लागवड झाली आहे.