Amravati News: लग्न लागताच नवरदेवाचा मृत्यू; अमरावती येथील घटना, लग्नघरी पसरली शोककळा
Heart Attack: लग्न लागून काही तास होत नाहीत तोच नवरदेवाचा हृदयविकाराने मृत्यू झाल्याने पुसला गावात शोककळा पसरली. अमोल गोडबोले यांच्या निधनाने नववधू तेजस्विनीवर आभाळ कोसळले असून गावात हळहळ व्यक्त केली जात आहे.
वरुड (जि. अमरावती) : लग्न लागल्यानंतर अवघ्या काही तासांतच नवरदेवाचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाल्याची घटना पुसला येथे मंगळवारी (ता. २५) दुपारच्या सुमारास घडली. या घटनेमुळे लग्नघरी शोककळा पसरली असून हळहळ व्यक्त केली जात आहे.