5 Dead After ST Bus Collides With Auto in Warud
esakal
वरुड : राजुराबाजार येथून प्रवासी घेऊन वरुडकडे येणाऱ्या ऑटोला समोरून येणाऱ्या शिवाई इलेक्ट्रिक बसने जोरदार धडक दिली. या अपघातात ऑटो चालकासह चौघांचा जागीच, तर एकाचा उपचारासाठी नेत असताना वाटेत मृत्यू झाला. ऑटोतील दोन प्रवासी गंभीर जखमी झाल्याची घटना १८ फेब्रुवारीला सकाळी साडेदहा वाजेच्या सुमारास वरुड-राजुराबाजार मार्गावरील चूडामन नदीच्या पुलालगत घडली.