

Amravati Wedding Attack
sakal
अमरावती : लग्नमंडपात स्वागतसमारंभ सुरू असताना एका युवकाने नवरदेवावरच प्राणघातक हल्ला करून हत्या करण्याचा प्रयत्न केल्याची खळबळजनक घटना येथे घडली. तर दुसऱ्या बाजूने जखमी युवकाच्या नातेवाइकांनी हल्लेखोरांच्या घरी धाव घेत तोडफोड केल्यामुळे बडनेऱ्यात तणावाची स्थिती निर्माण झाली होती.