
पुण्यातील वैष्णवी हगवणे प्रकरणानंतर आता राज्यात अनेक ठिकाणी अशा घटना उघडकीस येत आहेत. तर त्या प्रकरणानंतरही महिलांनी सासरच्या छळाला कंटाळून जीवन संपवल्याच्या घटना घडल्या आहेत. आता अमरावतीतून अशीच घटना समोर आलीय. पतीच्या त्रासाला कटाळून पत्नीनं गळफास घेत आत्महत्या केलीय. या प्रकरणी महिलेच्या आई-वडिलांनी सासरच्या मंडळींवर गंभीर आरोप केले आहेत. या प्रकरणी पती आणि सासूला ताब्यात घेतलं असून अधिक तपास सुरू आहे.