युवतीला भलताच प्रश्‍न विचारणाऱ्या युवकाला पोलिसांनी केली अटक; मनधरणी करण्याचा आटापिटा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

In Amravati a youth molested a girl

युवतीने आपल्यासोबत लग्न करावे, यासाठी संदीपने अनेक नातेवाईकांनाही हाताशी धरले होते. लग्नासाठी युवतीच्या कुटुंबीयांची मनधरणी करण्याचाही त्याने बराच आटापिटा केला. अखेर काहीच साध्य होत नसल्याचे बघून तिच्या घरासमोर जाऊन त्याने लग्नाची मागणी केली. नकार दिल्यास स्वत: आत्महत्या करण्याची धमकी दिली.

युवतीला भलताच प्रश्‍न विचारणाऱ्या युवकाला पोलिसांनी केली अटक; मनधरणी करण्याचा आटापिटा

अमरावती : शहरात युवती व महिलांच्या छेडखानीसह अत्याचाराच्या घटना वाढत आहेत. फ्रेजरपुरा ठाण्याच्या हद्दीत एका टवाळखोराने युवतीला ‘तुला सायकल आवडते, मी नाही आवडत’ असा थेट प्रश्‍न विचारून तिची छेडखानी केली. फ्रेजरपुरा पोलिसांनी या प्रकरणात संदीप सोनोने (वय ३६) याच्याविरुद्ध विनयभंग, ठार मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी गुन्हा दाखल करून अटक केली.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आर्थिक परिस्थिती बेताचीच असल्यामुळे पती-पत्नी दोघेही मजुरी करून कुटुंबाचा गाडा चालवितात व मुलांची शिक्षण पूर्ण करतात. याच दाम्पत्याची मुलगी बाराव्या वर्गात शिकते. त्या युवतीचा वर्षभरापासून संदीपने पाठलाग सुरू केला. अनेकदा पीडित घरात एकटी असताना संदीपने तिच्यापुढे बोलण्याचा प्रस्ताव ठेवला. हातवारेसुद्धा केले. हा घटनाक्रम पीडितेने पालकांना सांगितला.

क्लिक करा - सरकार फक्त तीन टक्केच शेतकऱ्यांना देणार मदत!; कारण वाचून बसेल धक्का

युवतीच्या पालकांनी मुलीवर नजर ठेवणाऱ्या संदीपची समजूत काढण्याचा प्रयत्न केला. परंतु, त्याच्या वर्तणुकीत काहीच फरक पडत नव्हता. आई-वडील दोघेही बाहेरगावी गेल्याचे बघून संदीपने युवतीची सायकल फेकल्याने ती तुटली. पीडितेने संदीपला त्याबाबत जाब विचारला असता त्याने पीडितेपुढे ‘तुला फक्त सायकल आवडते, मी नाही आवडत काय’, असा प्रश्‍न उपस्थित केल्याने युवती घाबरली.

युवतीने आपल्यासोबत लग्न करावे, यासाठी संदीपने अनेक नातेवाईकांनाही हाताशी धरले होते. लग्नासाठी युवतीच्या कुटुंबीयांची मनधरणी करण्याचाही त्याने बराच आटापिटा केला. अखेर काहीच साध्य होत नसल्याचे बघून तिच्या घरासमोर जाऊन त्याने लग्नाची मागणी केली. नकार दिल्यास स्वत: आत्महत्या करण्याची धमकी दिली. अखेर युवतीने फ्रेजरपुरा ठाण्यात तक्रार नोंदवली. पोलिसांनी त्याला अटक करून बुधवारी (ता. ११) न्यायालयासमोर हजर केले.

अधिक वाचा - शेतातील पडक्या खोलीतून येत होती दुर्गंधी; मित्राच्या सांगण्यावरून जाऊन बघितले असता आढळला महिलेचा कुजलेला मृतदेह

सोनोनेविरुद्ध कायदेशीर कारवाई
युवतीवर दबाव टाकण्याचा प्रयत्न होत असल्याच्या आरोपामुळे तत्काळ गुन्हा दाखल करून संशयित आरोपी संदीप सोनोनेविरुद्ध कायदेशीर कारवाई करण्यात आली.
- पुंडलिक मेश्राम,
पोलिस निरीक्षक, फ्रेजरपुरा ठाणे

संपादन - नीलेश डाखोरे

loading image
go to top