esakal | `मला धोका दिला न... तुला उडवू का?'; प्रेयसीला ठार मारण्याची धमकी
sakal

बोलून बातमी शोधा

Amravati youth threatens to kill his girlfriend

जिच्यावर आपण जीव ओवाळीत होतो, ती आता दुसऱ्याची झाली. याची माहिती सचिन लांडगे यास समजली. त्यामुळे तो चिडला. त्याने साथीदार मोहितच्या मदतीने युवतीचे घर गाठले. तिचा आधी गळा आवळला. आपल्याला धोका का दिला म्हणून तिच्या डोक्‍यावर रिव्हॉलव्हर सारखे शस्त्र ताणून धरले. तसेच चाकूही काढला.

`मला धोका दिला न... तुला उडवू का?'; प्रेयसीला ठार मारण्याची धमकी

sakal_logo
By
संतोष ताकपिरे

अमरावती : प्रेमात आकंठ बुडालेले बरेच जण वेळप्रसंगी बेभान होतात. मागचा पुढचा काहीच विचार न करता, ती किंवा तो स्वत:ची न होता, दुसऱ्याची तसेच दुसऱ्याचा झाल्याने जीव घेण्यापर्यंत युवक व युवतींची मजल जाते. अमरावती शहरातील राजापेठ ठाण्याच्या हद्दीत एका कॉलनीत सुद्धा असेच काहीसे घडले.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सचिन लांडगे (वय २७) हा मागील चार ते पाच महिन्यांपासून २२ वर्षीय युवतीच्या मागे लागला होता. त्याने तिचा पाठलाग सुरू केला होता. तिने प्रेमाने बोलावे, सोबत राहावे अशी त्याची इच्छा होती. परंतु, तिने सचिनच्या मागणीकडे दुर्लक्ष करून दुसऱ्याच्या गळ्यात वरमाला घातली. जिच्यावर आपण जीव ओवाळीत होतो, ती आता दुसऱ्याची झाली. याची माहिती सचिन लांडगे यास समजली.

जाणून घ्या - नोकराचा आला मालकिणीवर जीव; फोटोशूट करून केली भलतीच मागणी, आता...

त्यामुळे तो चिडला. त्याने साथीदार मोहितच्या मदतीने युवतीचे घर गाठले. तिचा आधी गळा आवळला. आपल्याला धोका का दिला म्हणून तिच्या डोक्‍यावर रिव्हॉलव्हर सारखे शस्त्र ताणून धरले. तसेच चाकूही काढला. रिव्हॉलव्हरने उडविण्याची धमकी देऊन जबर मारहाण करून जखमी केली. पीडितेच्या तक्रारीवरून पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

मला धोका दिला न... तुला उडवू का?

तिच्यासाठी सचिन वाट्टेल ते करायला तयार होता. परंतु, तिने दुसऱ्यासोबत लग्न करून आपला साथीदार निवडला. त्यामुळे चिडलेल्या टवाळखोराने तिच्या घरी जाऊन रिव्हॉलव्हरचा धाक दाखविला. तसेच जबर मारहाण केली. "मला धोका दिला न... तुला उडवू का?' अशा शब्दात तिला धमकी दिली. पीडितेचा मोबाईल हिसकावून फोडून नुकसान केल्याप्रकरणी सुद्धा सचिनविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. गुन्ह्यात सहकार्य केल्याप्रकरणी मोहित यास पोलिसांनी अटक केली आहे.

संपादन - नीलेश डाखोरे

loading image
go to top