पालकांनो, यंदा तुमच्या मुलाच्या गणवेशालाही कात्री, शासनाकडून ५० टक्के कपात

सुधीर भारती
Tuesday, 17 November 2020

प्रत्यक्षात जिल्हा परिषद शाळांसाठी 6 कोटी 85 लाख 60 हजारांचे तर मनपा शाळांसाठी 42.60 लाखांचे अनुदान मंजूर करण्यात आले होते. मात्र, गणवेश निधीला कात्री लावण्यात आल्याने 50 टक्केच निधी मंजूर करण्यात आला आहे.

अमरावती : कोरोनाचा फटका विद्यार्थ्यांनासुद्धा बसला आहे. यंदा एकाच गणवेशावर विद्यार्थ्यांची बोळवण करण्यात येत असून गणवेश खर्चात शासनाने तब्बल 50 टक्‍क्‍यांची कपात केलेली आहे. अमरावती जिल्हा परिषदेच्या शाळांतील विद्यार्थ्यांच्या गणवेशासाठी शासनाकडून 2 कोटी 87 लाख 95 लाखांचा निधी पाठविण्यात आला आहे. विशेष म्हणजे, मनपा शाळांसाठी 7.95 कोटींची तरतूद आहे.  

हेही वाचा - हे देवाऽऽ! मंदिर उघडताच चोरट्यांनी फोडली दानपेटी; सीसीटीव्हीवर झाकले होते पोते

कोरोनामुळे अद्याप राज्यातील शाळा सुरू झालेल्या नाहीत. तथापि शासनाने 23 नोव्हेंबरपासून 9 वी ते 12 वीपर्यंतचे वर्ग सुरू करण्यास परवानगी दिलेली आहे. त्याचप्रमाणे इयत्ता पहिली ते आठवीचे वर्ग सुरू करण्याचीसुद्धा शक्‍यता आहे. त्यामुळे शासनाने हालचाली सुरू केल्या आहे. नवीन शैक्षणिक सत्र 2020-21 करिता मोफत गणवेश योजनेच्या अंदाजपत्रकाससुद्धा मंजुरी देण्यात आली आहे. वर्ग पहिली ते आठवीच्या सर्व मुली, अनु. जाती जमाती, विमुक्त व भटक्‍या जाती मुली, ओबीसी संवर्गातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील मुलांना मोफत गणवेश योजनेचा लाभ देण्यात येतो.

हेही वाचा - आपल्या मादीला आकर्षित करण्यासाठी तयार करतात सुंदर घरटं...

मागील वर्षी प्रती विद्यार्थी 2 गणवेश प्रमाणे 400 रुपये शालेय व्यवस्थापन समितीच्या खात्यावर वळते करण्यात आले होते. मात्र, यंदा एकच गणवेश दिला जाणार आहे. त्यासाठी 200 रुपये अनुदान राहील. प्रत्यक्षात जिल्हा परिषद शाळांसाठी 6 कोटी 85 लाख 60 हजारांचे तर मनपा शाळांसाठी 42.60 लाखांचे अनुदान मंजूर करण्यात आले होते. मात्र, गणवेश निधीला कात्री लावण्यात आल्याने 50 टक्केच निधी मंजूर करण्यात आला आहे. त्यामुळे आता जिल्हा परिषदेसाठी 2 कोटी 87 लाख तर मनपा शाळांतील गणवेश पात्र विद्यार्थ्यांसाठी 7 लाख 96 हजारांचा निधी मिळणार आहेत.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: amravati zp received only 50 percent fund for student uniform