esakal | हे देवाऽऽ! मंदिर उघडताच चोरट्यांनी फोडली दानपेटी; सीसीटीव्हीवर झाकले होते पोते
sakal

बोलून बातमी शोधा

Thieves robbed a temple in Chandrapur

गोंडपिपरी तालुक्यातील धाबा येथे श्री संत कोंडया महाराज देवस्थान आहे. विदर्भ व तेलंगणातील हजारो भक्तांची महाराजांवर मोठी श्रध्दा आहे. मंदिराच्या बाहेर एक तर आत एक अशा दोन दानपेट्या आहेत. यापैकी बाहेर असलेल्या दानपेटीवर चोरट्यांनी डल्ला मारला.

हे देवाऽऽ! मंदिर उघडताच चोरट्यांनी फोडली दानपेटी; सीसीटीव्हीवर झाकले होते पोते

sakal_logo
By
संदीप रायपुरे

गोंडपिपरी (जि. चंद्रपूर) : महाराष्ट्र व तेलंगणातील शेकडो भाविकांचे श्रध्दास्थान असलेल्या धाबा येथील कोडंया महाराज देवस्थानातील दानपेटी भामट्यांनी फोडली. घटनेची माहिती कुणालाही होऊ नये यासाठी चोरट्यांनी मंदिर परिसरातील सीसीटीव्हीला पोत्यांनी झाकून वायर कापले व दानपेटी फोडली. राज्य सरकारने मंदिर उघडण्यास परवानगी दिल्यानंतर पहिल्याच दिवशी हा प्रकार घडला. मंदिर प्रशासनाने याप्रकरणी पोलिसांत तक्रार दाखल केली आहे.

गोंडपिपरी तालुक्यातील धाबा येथे श्री संत कोंडया महाराज देवस्थान आहे. विदर्भ व तेलंगणातील हजारो भक्तांची महाराजांवर मोठी श्रध्दा आहे. मंदिराच्या बाहेर एक तर आत एक अशा दोन दानपेट्या आहेत.

यापैकी बाहेर असलेल्या दानपेटीवर चोरट्यांनी डल्ला मारला. मंदिर परिसरात सीसीटीव्ही आहे. आपल्या चोरीचा प्रकार उघड होऊ नये यासाठी त्यांनी सीसीटीव्हीवर चक्क पोते झाकले होते. नंतर वायरी कापले व दानपेटी फोडली.

सविस्तर वाचा - चारित्र्यावर संशय घेतल्याने प्रेयसीची आत्महत्या; प्रेमविवाहाचा करुण अंत, प्रियकराविरुद्ध गुन्हा दाखल

चोरट्यांनी मंदिर उघडताच रक्कम लांबविली. मागील पंधरवाड्यापूर्वी देखील असाच प्रकार घडला होता. मंदिर प्रशासनाने दानपेटी फोडल्याच्या घटनेची तक्रार पोलिसात दाखल केली आहे. याप्रकरणाचा तपास धबा पोलिस करीत आहे.

संपादन - नीलेश डाखोरे

loading image
go to top