Video : कोरोनाविरुद्ध लढा देताना काय करीत आहेत पालकमंत्री यशोमती ठाकूर? जाणून घ्या...

Amravati's Guardian Minister Yashomati Thakur in Action against corona
Amravati's Guardian Minister Yashomati Thakur in Action against corona

अमरावती : जगासह देशाला कोरोनाने चांगलेच ग्रासले आहेत. रोज कोरोना ग्रस्तांची संख्या वाढतच आहे. यामुळे प्रशासन चिंतेत आहेत. नागपुरात एका वेळेस चार-सहा असे रुग्ण वाढत आहेत. दुसरीकडे यवतमाळ व अमरावती जिल्ह्यात याचे प्रमाण खूप कमी आहे. असे असले तरी कोरोनाची प्रत्येक माहिती घेण्यासाठी अमरावती जिल्ह्याच्या पालकमंत्री यशोमती ठाकूर झटत आहेत. त्यांचे प्रत्येक गोष्टींवर बारकाईने लक्ष असल्याचे दिसून येते. एकप्रकारे त्या कोरोनाविरुद्ध ऍक्‍शन मोडमध्ये असल्याचे दिसून येत आहेत. 

जिल्ह्याच्या लढवय्या नेत्या तसेच राज्याच्या महिला व बालविकासमंत्री ऍड. यशोमती ठाकूर यांनी पहिल्या दिवसापासून कोरोनाविरुद्धच्या लढ्यात स्वतःला झोकून दिले आहेत. जिल्ह्याच्या नागरिकांच्या संरक्षणासाठी त्या प्रचंड कष्ट घेत आहेत. विशेष म्हणजे, नागरिकांना घराबाहेर न पडण्याचे आवाहन करण्यापासून तर रुग्णालयाची व्यवस्था, स्वस्त धान्याचे योग्य पद्धतीने वितरण, अडचणीत असलेल्यांना मदतीचा हाथ, क्वारंटाईन असलेल्या नागरिकांची विचारपूस, निवारा केंद्रांची व्यवस्था, एवढेच नव्हे तर भविष्यात निर्माण होणाऱ्या पाणीटंचाईच्या विषयाकडेसुद्धा त्यांचे लक्ष आहे. त्या वारंवार अधिकाऱ्यांशी संवाद साधून स्थितीवर नियंत्रण ठेवून आहेत. 

अमरावती जिल्ह्यात कोरोना विषाणूचा संसर्ग रोखण्यासाठी जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांनी हाती घेतलेल्या सर्वच अभियानात पालकमंत्र्यांची उत्तम साथ आहे. शुक्रवारपर्यंत (ता. 17) चार हजार 710 नागरिक विविध ठिकाणी क्वारंटाइन आहेत. कोरोना पॉझिटिव्ह आलेल्या रुग्णांची संख्या सहा असून, त्यातील एकाचा मृत्यू झाला आहे. 

थ्रोट स्वॅब तपासणी केंद्रासाठी घेतला पुढाकार

अमरावतीत थ्रोट स्वॅब तपासणीची कोणतीच व्यवस्था नसल्याने सध्याच्या स्थितीत 104 नमुन्यांचा अहवाल प्रलंबित आहेत. पालकमंत्र्यांनी पुढाकार घेत सरकारसोबत वारंवार संवाद साधून संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठात थ्रोट स्वॅब तपासणी केंद्र सुरू करण्यात यश मिळविले. त्यामुळे तपासणीचे अहवाल लवकर हाती येणार आहेत. त्यातून रुग्णांवर तातडीने उपचार करण्यास मदत होणार आहे. 

जिल्ह्याकडे कायम लक्ष

कोरोना व लॉकडाउनच्या कठीण प्रसंगात काही नागरिक नवनवे प्रयोग करून नागरिकांचे जीव वाचविण्यासाठी पुढे येत आहेत. अशा नागरिकांचे कौतुक करून त्यांच्या उपक्रमांची प्रशंसासुद्धा पालकमंत्री यशोमती ठाकूर सातत्याने करीत आहेत. राज्याच्या महिला व बालविकासमंत्री असल्याने त्यांना मुंबईला जाणे अनेकदा आवश्‍यक झाले होते. मात्र, आपला जिल्हा त्यांनी सोडला नाही व येथील स्थिती नियंत्रणात राहावी, यासाठी सातत्याने प्रयत्न केले. विशेष म्हणजे त्यांची कन्यासुद्धा नागरिकांना मदतीचा हात देत आहे.

कोरोनाविरुद्धचा लढा तीव्र

शहराच्या आमदार सुलभा खोडके यांनीसुद्धा या कठीण प्रसंगात अमरावतीकरांना दिलासा दिला आहे. स्वस्तः धान्य दुकानातून नागरिकांना धान्य मिळवून देण्यासोबतच थ्रोट स्वॅब मशीनसाठी त्यांनीदेखील शासनाकडे पाठपुरावा केला होता. या दोन्ही महिला लोकप्रतिनिधींच्या प्रयत्नांमुळेच कोरोनाविरुद्धचा लढा अमरावतीत तीव्र झाला आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com