

अमरावती : अमरावतीकरांची विमानसेवेची प्रतीक्षा अखेर संपली असून अमरावती ते मुंबई या बहूप्रतीक्षित विमानसेवेच्या शुभारंभाचा मुहूर्त अखेर ठरला आहे. येत्या १६ एप्रिलला अमरावतीच्या बेलोरा विमानतळावरून अलायन्स एअरचे विमान मुंबईच्या दिशेने झेपावणार आहे. याच दिवशी विमानसेवेचा शुभारंभ होणार असून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यावेळी प्रामुख्याने उपस्थित राहणार असल्याचे सांगण्यात आले.