पुन्हा टिवटिव : अमृता फडणवीस कोणाला म्हणाल्या, 'झाले गेले विसरूनी जावे'

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 6 फेब्रुवारी 2020

महाराष्ट्रात गेल्या २ महिन्यांत चार अॅसिड अटॅकच्या दुर्देवी घटना घडल्या अहेत. वर्धा जिल्ह्यातील हिंगणघाट येथे पेट्रोल टाकून प्राध्यापक महिलेला जाळण्याचा प्रयत्न झाला. तसेच औरंगाबादमधील बलात्काराचे प्रकरण ऐकून त्रास होतो. आपल्यातील भांडणे विसरून महिलांच्या सुरक्षिततेविषयी कठोर निर्णय घेणे आवश्यक असल्याचे अमृता फडणवीस यांनी मुख्यमंत्र्यांना उद्देशून म्हटले आहे.

नागपूर : विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनी पुन्हा एक ट्विट केला आहे. विशेष म्हणजे, हाही ट्विट त्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना उद्देशून केला आहे.

अमृता फडणवीस यांनी महिलांच्या सुरक्षेसाठी कठोर निर्णय घेणे गरजेचे असल्याचे मत त्यांच्या ट्विटच्या माध्यमातून व्यक्त केले आहे. सदर ट्विट त्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना टॅग देखील केले आहे.

महाराष्ट्रात गेल्या २ महिन्यांत चार अॅसिड अटॅकच्या दुर्देवी घटना घडल्या अहेत. वर्धा जिल्ह्यातील हिंगणघाट येथे पेट्रोल टाकून प्राध्यापक महिलेला जाळण्याचा प्रयत्न झाला. तसेच औरंगाबादमधील बलात्काराचे प्रकरण ऐकून त्रास होतो. आपल्यातील भांडण विसरून महिलांच्या सुरक्षिततेविषयी कठोर निर्णय घेणे आवश्यक असल्याचे अमृता फडणवीस यांनी मुख्यमंत्र्यांना उद्देशून म्हटले आहे.

यासोबतच अमृता फडणवीस यांनी देवेंद्र फडणवीस सरकारच्या ‘मनोधैर्य’ ह्या ‘acid attack victors’ साठी असलेल्या योजनेतील सवलती हिंगणघाटच्या पीडितेला देण्यात याव्या आणि महिला आयोग अध्यक्षाचे पद लवकर भारण्यात यावे. माननीय हिंदू हृदयसम्राट बाळासाहेबांचे खरे स्वप्न आता जामिनीवर येऊन पूर्ण करा, असा खोचक सल्ला देखील त्यांनी मुख्यमंत्र्यांना आपल्या ट्विटमधून दिला. 

- देवाकडे प्रार्थना करा, पुढचे सात दिवस पीडितेसाठी महत्त्वाचे

हिंगणघाट येथे एकतर्फी प्रेमातून माथेफिरू तरुणाने शिक्षिकेला पेट्रोल टाकून जिवंत जाळण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे ही पीडिता जीवन-मृत्यूशी संघर्ष देत आहे. ही घटना ताजी असतानाच पुन्हा एकदा महाराष्ट्र अशाच एका घटनेने हदरला आहे. औरंगाबादमध्ये घरात घुसून एका महिलेला जिवंत जाळण्यात आले. यामध्ये महिला ९५ टक्के भाजली होती. महिलेचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. या प्रकरणात एकाला अटक करण्यात आली आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Amruta fadanvis tweet about women sefty