esakal | मोठी बातमी! डॉ. शीतल आमटे-करजगी यांच्या शोकसभेला संपूर्ण आमटे कुटुंब अनुपस्थित; कोरोनाचं कारण देत पाठवलं शोकपत्र
sakal

बोलून बातमी शोधा

Amte family is absent on condolence meet of Doctor Shital amte

करजगी कुटुबींयांनी रविवारी आयोजित केलेल्या डॉ.शीतल आमटे यांच्या श्रद्धांजली सभेला आमटे कुटुंब अनुपस्थित होते. यामुळे विविध चर्चेला पेव फुटले आहेत. तर आमटे कुटुंब कोरोनामुळे शोकसभेला उपस्थित न राहिल्याचे सांगण्यात येत आहे.

मोठी बातमी! डॉ. शीतल आमटे-करजगी यांच्या शोकसभेला संपूर्ण आमटे कुटुंब अनुपस्थित; कोरोनाचं कारण देत पाठवलं शोकपत्र

sakal_logo
By
प्रमोद काकडे

आनंदवन (जि. चंद्रपूर) : ज्येष्ठ समाजसेवक बाबा आमटे यांची नात, डॉ. विकास आमटे यांची कन्या आणि आनंदवन येथील महारोगी सेवा समितीच्या सीईओ डॉ. शीतल आमटे-करजगी यांनी ३० नोव्हेंबरला सकाळी ११ वाजता आत्महत्या केली होती. त्यांच्या आत्महत्येचे कारण अजून स्पष्ट झाले नाही. मात्र, काही दिवसांपासून त्या तणावात होत्या असे काही दिवसांपूर्वी आमटे कुटुंबीयांनी सोशल माध्यमावर टाकलेल्या निवेदनात म्हटले होते. 

करजगी कुटुबींयांनी रविवारी आयोजित केलेल्या डॉ.शीतल आमटे यांच्या श्रद्धांजली सभेला आमटे कुटुंब अनुपस्थित होते. यामुळे विविध चर्चेला पेव फुटले आहेत. तर आमटे कुटुंब कोरोनामुळे शोकसभेला उपस्थित न राहिल्याचे सांगण्यात येत आहे.

अधिक माहितीसाठी - राणे दाम्पत्य आत्महत्या प्रकरणाचे गूढ उकलले : कुत्र्याचे इंजेक्शन देऊन पत्नीने केला पती, मुलांचा खून

येथील महारोगी सेवा समिती आनंदवनच्या मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ शीतल आमटे यांचा ३० नोव्हेंबर रोजी संशयास्पदरीत्या मृत्यू झाला. या मृत्यू प्रकरणातील गूढ अद्यापही कायम आहे. दरम्यान डॉ.शीतल यांचे पती गौतम करजगी यांनी आज, रविवारी डॉ. शीतल यांना आनंदवनात श्रद्धांजली अर्पण करण्याकरिता शोकसभेचे आयोजन केले होते. 

दुपारी बारा वाजता या शोकसभेला सुरुवात झाली.डॉ.शीतल यांच्या समाधिस्थळी पुष्प अर्पण करून श्रद्धांजली वाहिल्यानंतर सभेला सुरुवात झाली. यावेळी २०० पेक्षा अधिक नागरिक आणि आनंदवनप्रेमी उपस्थित होते. बाहेर देशातील काही व्यक्तींनी झूम ॲपद्वारे संपर्कात येऊन त्यांनी डॉ. शीतल यांच्या मृत्यू प्रति दुःख व्यक्त केले. तसेच त्यांना श्रद्धांजली वाहिली. परंतु,आमटे परिवारातील एकही सदस्य या शोकसभेला उपस्थित नव्हते. 

हेही वाचा - हृदयद्रावक! एकुलत्या एक मुलाचा भटक्या कुत्र्याने घेतला जीव; विधवा आईवर कोसळला दुखाचा डोंगर

कोरोनाचे कारण पुढे करून त्यांनी उपस्थित होण्याचे टाळले. यासंदर्भात आमटे कुटुंबाने एक पत्र पाठविले होते. ते पत्र आनंद निकेतन महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. मृणाल काळे यांनी शोकसभेत वाचून दाखविले. इतर सर्व नागरिक या कार्यक्रमाला उपस्थित राहत असताना आमटे कुटुंब यांची अनुपस्थिती अनेकांच्या भुवया उंचावणारी होती.

संपादन - अथर्व महांकाळ 
 

loading image
go to top