चंद्रपूर जिल्ह्यातील प्राचीन विहिरी गुगलच्या नकाशावर

चंद्रपूर जिल्ह्यातील प्राचीन विहिरी गुगलच्या नकाशावर
Summary

बारव बचाव आंदोलनाचे प्रणेते रोहन काळे यांच्या पुढाकारातून प्राचीन विहिरी गुगलच्या नकाशावर आल्या आहेत.

पोंभुर्णा (चंद्रपूर): जिल्ह्यात पायऱ्या असलेल्या ऐतिहासिक विहिरी मोठ्या प्रमाणावर आहेत. यातील काही दुर्लक्षित, तर काही सुस्थितीत आहेत. या विहिरींचे संवर्धन केल्यास अनेक ठिकाणांवरची पाण्याची समस्या सुटू शकते. आता याच प्राचीन विहिरी एका क्लिकवर तुम्ही बघू शकणार आहेत. बारव बचाव आंदोलनाचे प्रणेते रोहन काळे यांच्या पुढाकारातून प्राचीन विहिरी गुगलच्या नकाशावर आल्या आहेत.

चंद्रपूर जिल्ह्यातील प्राचीन विहिरी गुगलच्या नकाशावर
चंद्रपूर : गॅस गळतीमुळे एकाच कुटुंबातील ६ जणांचा मृत्यू

पोंभुर्णा येथे राजराजेश्वर मंदिर परिसरात पायऱ्या असलेली विहीर आहे. ही विहीर आता गुगलच्या नकाशावर आली आहे. आठव्या शतकात तंजावर राजाने पोंभुर्णात विहिरीचे दगडांनी बांधकाम केले. त्या विहिरीत उतरून पाणी पिण्यासाठी पायऱ्या ठेवण्यात आल्या आहेत. कित्येक वर्षांपासून याच विहिरीच्या पाण्यातून पोंभुर्णावासींची तहान भागविली जात होती. मात्र, काही काळापासून या विहिरीचे पाणी वापरणे कमी झाले. त्यामुळे विहिरीची दुर्दशा झाली होती. या विहिरीचे जतन करावे, यासाठी ऐतिहासिक वारसा संवर्धन समिती व तत्कालीन नगराध्यक्ष स्व. गजानन गोरंटीवार यांनी प्रयत्न केले. विविध विभागांशी त्यांनी वारंवार पत्रव्यवहार केला. याला यश आले. तत्कालीन अर्थ नियोजन व वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी या मंदिराचा जीर्णोद्धार करण्यासाठी निधी उपलब्ध करून दिला. आज ही विहीर चांगल्या अवस्थेत आहे.

चंद्रपूर जिल्ह्यातील प्राचीन विहिरी गुगलच्या नकाशावर
चंद्रपूर : देवटोक येथे उत्‍खननात सापडली शिवपिंड; ५ फूट लांब आणि १ फूट उंच

आपला ऐतिहासिक वारसा हा गुगलवर आल्याने पर्यटकांना शोधत राहावे लागणार नाही. एकाच क्लिकवर सर्व ऐतिहासिक विहिरींची माहिती आपल्याला मिळणार आहे. जिल्ह्यातील भद्रावती, चंद्रपूर, नागभीड, चिमूर आणि नागभीड येथील प्राचीन विहिरीही गुगलवर आणण्याच्या दृष्टीने बारव बचाव आंदोलनाचे प्रयत्न सुरू आहेत.

चंद्रपूर जिल्ह्यातील प्राचीन विहिरी गुगलच्या नकाशावर
Big Breaking : चंद्रपूर जिल्ह्यातील दारूबंदी उठली; मंत्रिमंडळाचा निर्णय

विहिरींचे व्हावे संवर्धन

बारव बचाव आंदोलनाचे प्रणेते रोहन काळे यांनी या विहिरीचे गुगल मॅपिंग केले. आता ही विहीर जगाच्या नकाशावर आली. यामुळे आता कुणालाही ही विहीर गुगलच्या माध्यमातून बघता येणार आहे. पायऱ्या पद्धतीने बांधकाम केलेल्या चंद्रपूर जिल्ह्यातील १५ ते २० विहिरी आहेत. या सर्व विहिरींचे गुगल मॅपिंग झाले आहेत. यात चिमूर तालुक्यातील दोन विहिरी आहेत. त्याही गुगलवर आल्या आहेत. मात्र, या विहिरींचे संवर्धन झाले नाही. त्या सर्व विहिरींचे पोंभुर्णा शहरात असलेल्या विहिरीसारखे संवर्धन व्हावे, अशी मागणी केली जात आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com