...आणि अभियंत्यांने दिली शेण उचलण्याची पशुवैद्यक अधिकाऱ्यांना सूचना 

file photo
file photo
Updated on

अमरावती ः पशूपालकाने शेणखत टाकल्याने महापालिकेने बांधलेली नाली चोक झाली. त्यामुळे परिसरातील नागरिक त्रस्त झालेत. आयुक्तांकडे थेट आलेल्या या तक्रारीवर कारवाई करताना महापालिकेतील विभागातील असमन्वय व बेजबाबदार वर्तन अधोरेखित झाले. झोन अभियंत्याने आपली जबाबदारी दुसऱ्यावर ढकलत सुटका करून घेण्याचा प्रयत्न केला, तर स्वच्छता विभागाने असहकाराचे प्रदर्शन करून त्यांचे काम दुसऱ्या विभागावर ढकलण्याचा प्रयत्न केला. 

यशोदानगर भागात जुन्या बायपास मार्गावर पशूपालकाचा मोठा गोठा आहे. तो पशूंचे शेण बायपास रोडलगतच्या मनपाने बांधलेल्या मोठ्या नालीत टाकतो. त्यामुळे ही नाली चोक झाली असून दुर्गंधीमुळे नागरिक त्रस्त झाले आहेत. याची तक्रार शेजारी राहत असलेल्या एका वकिलाने थेट आयुक्तांकडे केली. आयुक्तांनी तातडीने हमालपुरा झोनचे अभियंता भास्कर तिरपुडे यांना स्थळनिरीक्षण करून कारवाई करण्यासाठी रवाना केले. तिरपुडे गेले खरे, मात्र माघारी फिरले. त्यांनी पशुवैद्यकीय अधिकारी यांना शेण उचलून टाकण्यास सांगितले. पशुवैद्यक अधिकाऱ्यांनी त्यांना स्वच्छता विभागाकडून यंत्रणा उपलब्ध करून घ्या व कारवाई करण्यात येईल, असे स्पष्ट केले. स्वच्छता विभागातील डॉ. अजय जाधव यांना त्यांनी यंत्रणा देण्यास सांगितले. मात्र डॉ. जाधव यांच्याकडून तिरपुडे यांना हवा तसा प्रतिसाद मिळाला नाही. 

दरम्यान, पशूमालकाने दिलेल्या धमकीमुळे घाबरलेल्या अभियंता तिरपुडे यांनी थेट आयुक्तांकडे गाऱ्हाणे मांडले. याच पशुमालकाने यापूर्वी महापालिकेच्या पशुवैद्यक अधिकाऱ्यांसोबत वाद केला आहे. त्यावेळी त्याला चांगलाच धडा शिकविण्यात आला होता. या वेळी मात्र धमकी मिळताच महापालिकेचे अधिकारी उलटपावली परतले. शेण जप्त करून त्याची विल्हेवाट लावण्यासाठी तीन विभागांतील असमन्वय व असहकार या घटनेच्या निमित्ताने समोर आला. यासोबतच एकमेकांवर जबाबदारी ढकलण्याचाही प्रकार अधोरेखित झाला. आयुक्त यावर काय निर्णय घेतात, यावर पुढील कारवाई अवलंबली आहे. 

-संपादन ः चंद्रशेखर महाजन 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com