कोरोनाच्या दहशतीमुळे पुण्या-मुंबईतील विद्यार्थ्यांची घरवापसी, पालकांचा जिवात जीव

दिपक खेकारे
बुधवार, 18 मार्च 2020

जीवनावश्‍यक वस्तू वगळता बाकी सर्व बाजारपेठ ठणठणीत बंद ठेवण्यात आली असून बाजारपेठेत शुकशुकाट आहे. जिल्हयातील मोठी बाजारपेठ म्हणून ओळखली जाणाऱ्या गडचांदूर बाजरपेठेत आठवडी बाजार असून सुद्धा शुकशुकाट होता.

गडचांदुर ( जि.चंद्रपूर) : कोरोनामुळे नागरिकांमध्ये भीती निर्माण झाली आहे. त्यामुळे अगदी मुंबई ,पुणे,नागपूर, दिल्ली इथे शिक्षण, नोकरीच्या निमित्ताने असलेल्या मुलांना गावी परतण्याचे आर्जव पालक करीत आहेत.
बाहेर देशात रोजगारासाठी व शिक्षणासाठी गेलेले नागरिक देशात परतले असून राज्यातील अनेक शहरात रोजगार व शिक्षणासाठी गेलेले विद्यार्थी गावी परतत आहेत. किमान या संसर्जजन्य आजारापासून गावात तरी सुरक्षितता मिळेल हीच त्यांची अपेक्षा आहे. कोरोनाच्या दहशतीखाली असणाऱ्या पालकांना आपल्या पाल्याची चिंता भेडसावत असून ते आपल्या पाल्यांना या चिमणांनो परत फिरा रे असे आर्जव करीत आहेत.
शिक्षणानंतर युवक रोजगारासाठी मुंबई पुणे सारख्या मोठ्या शहरांमध्ये जातात. कोरोना व्हायरसमुळे काही कंपन्यांनी आधीच सुट्या घोषित केल्या आहे .
आता शासनाच्या वतीने शाळा महाविद्यालयाना सुट्ट्या दिल्याने अनेकांनी गावाची वाट धरली आहे. काहीजण घरून काम करणार आहेत.
जीवनावश्‍यक वस्तू सोडून गडचांदूरतील बाजारपेठ बंद
जीवनावश्‍यक वस्तू वगळता बाकी सर्व बाजारपेठ ठणठणीत बंद ठेवण्यात आली असून बाजारपेठेत शुकशुकाट आहे. जिल्हयातील मोठी बाजारपेठ म्हणून ओळखली जाणाऱ्या गडचांदूर बाजरपेठेत आठवडी बाजार असून सुद्धा शुकशुकाट होता.

सविस्तर वाचा - नागपुरात सामाजिक, राजकीय, धार्मिक सभांना बंदी...प्रशासनाने दिले हे आदेश
मेसही बंद
वडिलांना आमच्या तब्येतीची काळजी असून मी पुण्यात स्पर्धा परीक्षेची तयारी करीत आहे वडिलांनी तात्काळ घरी येणाचे सांगितले व पुण्यातील मेस , वाचनालये बंद असल्यामुळे अडचणी निर्माण झाल्या आहे
विशाल कोवे
पुणे येथे स्पर्धा परीक्षा तयारी करणारा विद्यार्थी  

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Corona effect! parents waiting for their childern