

Naldamanti Sagar Bridge
sakal
मोर्शी : नळदमयंती सागर (अप्पर वर्धा धरण) गेटसमोरील मोर्शी व आष्टी या दोन तालुक्यांना थेट जोडणारा दीर्घकाळ प्रलंबित पूल बांधण्यास अखेर केंद्रीय मंजुरी प्राप्त झाली आहे. तब्बल ३५ कोटी रुपयांचा निधी प्रकल्पासाठी मंजूर झाल्याने स्थानिक नागरिकांच्या दशकांपासूनच्या मागणीची पूर्तता आता प्रत्यक्षात होणार आहे.