
यवतमाळ : टिपेश्वर अभयारण्याच्या वेशीवर असलेल्या अंधारवाडी या आदिवासी गावात आगळावेगळा उपक्रम साकारण्यात आला आहे. हे संपूर्ण गावच ‘मधाचे गाव’ करण्यात आले असून मध विक्रीतून या गावात समृद्धी येणार आहे. यासाठी पांढरकवडा प्रकल्प अधिकारी सुहास गाडे यांनी पुढाकार घेतला.