

Anganwadi Workers Pension
sakal
चंद्रपूर : राज्य शासनाच्या प्रत्येक विभागांतून सेवानिवृत्त होणाऱ्या अधिकारी, कर्मचाऱ्यांना पेन्शन, ग्रॅच्युइटीसह अन्य लाभ दिले जातात. मात्र, याला अंगणवाडी सेविका, मदतनीस अपवाद आहेत. राज्य शासनाच्या महिला व बालकल्याण विभागात कार्यरत सेविका, मदतनिसांना गेल्या पन्नास वर्षांच्या काळापासून ना पेन्शन मिळते ना ग्रॅच्युइटी. सेवानिवृत्तीचा अत्यल्प लाभ देऊन त्यांची बोळवण सुरू आहे.