esakal | दारू पिण्यास मनाई केल्याने पती चवताळला... रागाच्या भरात रस्त्यावर ओढून केली मारहाण, मग

बोलून बातमी शोधा

fight1

उच्चभ्रू समाजात श्रीमंत घरच्या महिला मुक्तपणे मद्य प्राशन करतात. किंबहुना या हाय प्रोफाईल सोसायटीत मदिरापान करणे हे स्टेटसचे लक्षण मानले जाते. सर्वधारण समाजात ही रित नाही. ग्रामीण व सामान्य कुटुंबातील महिलांना पतीच्या म्हणण्यानुसार वागावे लागते.

दारू पिण्यास मनाई केल्याने पती चवताळला... रागाच्या भरात रस्त्यावर ओढून केली मारहाण, मग
sakal_logo
By
सकाळवृत्तसेवा

भंडारा : दारूमुळे अनेकांच्या जीवनाची आणि संसाराची राखरांगोळी होते. त्यातच दारूच्या आहारी गेलेली व्यक्ती कधी काय करेल? कुठले चुकीचे पाऊल उचलेल याचा नेम नाही. मोहाडी तालुक्यातील सुकळी येथे पत्नीला दारू पिण्यासाठी एकाने आग्रह केला. मात्र, तीने नकार दिल्याने संतापलेल्या मद्यपी तरुणाने शिविगाळ करीत चक्क तिच्यावर चाकूने हल्ला केला. यात ती गंभीररित्या जखमी झाली. सध्या तिच्यावर जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

उच्चभ्रू समाजात श्रीमंत घरच्या महिला मुक्तपणे मद्य प्राशन करतात. किंबहुना या हाय प्रोफाईल सोसायटीत मदिरापान करणे हे स्टेटसचे लक्षण मानले जाते. सर्वधारण समाजात ही रित नाही. ग्रामीण व सामान्य कुटुंबातील महिलांना पतीच्या म्हणण्यानुसार वागावे लागते. पती दारू पिऊन त्रास देत असल्याने महिला हिंसाचाराच्या घटनेत भर पडत असून दारूमुळे अनेकांच्या संसाराची वाताहत होत आहे.

पोलिस तक्रारीत नमूद केल्याप्रमाणे सूरज रामनाथ मारवे (वय ३०) रा. सुकळी(ता. मोहाडी)  असे आरोपीचे नाव आहे. त्याने पत्नी काजल (वय २४)  हिला बुधवारी (२० मे) सांयकाळी दारू पिण्याचा आग्रह केला. तेव्हा काजल ही रागाने घराबाहेर पडली. पती सूरज याने तिला शिविगाळ करणे सुरू केले. तुमचे हे वागणे रोजचेच आहे. मी आपल्या भावाला फोन करून सांगते, असे म्हटले असता सूरज काजलच्या मागे धावला. तिचे केस ओढून त्याने हातातील चाकूने तिच्या मानेवर, नाकावर व गालावर हल्ला करून जीवे मारण्याचा प्रयत्न केला.

कोरोनावर खरेच सापडले औषध?त्याच्या दाव्याला पंतप्रधान कार्यालयाच्या उत्तराची प्रतीक्षा

रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या काजलवर सध्या जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत. तिने दिलेल्या बयाणावरून मोहाडी पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून, पुढील तपास पोलिस उपनिरिक्षक थेरे करीत आहेत.