esakal | विहिरींना कठडे बसविल्यास प्राणी सुरक्षित; नाकाडोंगरी पॅटर्न ठरला यशस्वी
sakal

बोलून बातमी शोधा

विहिरींना कठडे बसविल्यास प्राणी सुरक्षित; नाकाडोंगरी पॅटर्न यशस्वी

विहिरींना कठडे बसविल्यास प्राणी सुरक्षित; नाकाडोंगरी पॅटर्न यशस्वी

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

मांजरखेड कसबा (जि. अमरावती) : वन परिसरालगतच्या शेतशिवारात कठडे नसल्यामुळे विहिरींमध्ये पडून वन्यप्राणी मृत्युमुखी पडत आहेत. वन्यप्राण्यांचे संरक्षण (Wildlife Conservation) व्हावे यासाठी नाकाडोंगरी येथे श्‍यामाप्रसाद मुखर्जी जन विकास योजना व केंद्र पुरस्कृत योजनेतून मोकळ्या विहिरींना कठडे बांधण्यात आले. याची फलनिष्पत्ती म्हणजे यानंतर या परिक्षेत्रात एकही वन्यप्राणी विहिरीत पडल्याची घटना घडली नाही. अशाच प्रकारचा पॅटर्न राज्यभर राबविण्याची मागणी होत आहे. विहिरींना कठडे लावल्यास निश्‍चितच मृत्यूच्या प्रमाणात घट होईल. शिवाय रेस्क्‍यू टीमचे परिश्रम व वेळेत बचत होईल. (Animals will be safe if wells are walled, Amravati animal news)

नुकतेच भंडारा जिल्ह्यात टेकेपार सिंचन प्रकल्पाच्या टाक्‍यात पडून वाघांच्या दोन बछड्यांचा मृत्यू झाला होता. अमरावती जिल्ह्यासह अन्य जिल्ह्यातही अनेक ठिकाणी वन्यप्राणी विहिरीमध्ये पडून मरण्याच्या घटना वाढतच आहेत. विशेषतः उन्हाळ्यात ही वाढ अधिक होत असल्याचे आढळून आले आहे. काही ठिकाणी तर वन विभागाच्या रेस्क्‍यू टीमला विहिरीतून प्राण्यांना जिवंत काढताना तारेवरची कसरत करावी लागत आहे. विहिरींना कठडे लावल्यास निश्‍चितच मृत्यूच्या प्रमाणात घट होईल. शिवाय रेस्क्‍यू टीमचे परिश्रम व वेळेत बचत होईल.

हेही वाचा: चंद्रशेखर बावनकुळे अचानक मौनात! राजकीय वर्तुळात उलट-सुलट चर्चा

२८ एप्रिलला चांदूररेल्वे तालुक्‍यातील मांडवा शिवारात तब्बल १४ रानडुक्कर विहिरीत पडले होते. त्यातील ११ रानडुक्करांना वाचविण्यात यश आले. १३ मे रोजी सालोड भागात दोन नीलगायी व काळवीट पडल्याची घटना घडली. यातही एकाचा जीव गेला. २०१८ मध्ये अकोट परिसरातील रुईखेड भागात तब्बल शंभर फूट खोल विहिरीत बिबट व काळवीट विहिरीत पडले. त्यांना विहिरीतून काढण्यासाठी रेस्क्‍यू टीमने जिवाची बाजी लावली. त्यापैकी बिबटला जिवंत काढल्याचा अनुभव वनरक्षक अमोल गावनेर यांनी सांगितला.

हेही वाचा: विदर्भात १५ जूनपर्यंत मॉन्सून धडकणार? हवामान विभागातर्फे संकेत

विहिरींना कठडे बांधण्यासाठी प्रभावी नियोजन केल्यास वन्यप्राण्यांना व पर्यायाने शेतकऱ्यांनाही उपयोगी ठरेल. त्यामुळे हे राज्यव्यापी करणे गरजेचे आहे.
- यादव तरटे, सदस्य, राज्य वन्यजीव मंडळ

(Animals will be safe if wells are walled, Amravati animal news)