esakal | चंद्रशेखर बावनकुळे अचानक मौनात! राजकीय वर्तुळात उलट-सुलट चर्चा
sakal

बोलून बातमी शोधा

चंद्रशेखर बावनकुळे अचानक मौनात! राजकीय वर्तुळात उलट-सुलट चर्चा

चंद्रशेखर बावनकुळे अचानक मौनात! राजकीय वर्तुळात उलट-सुलट चर्चा

sakal_logo
By
राजेश चरपे

नागपूर : महाविकास आघाडीला (Mahavikas Aghadi) सातत्याने धारेवर धरणारे, पत्रकार परिषदांच्या माध्यमातून भाजपची बाजू मांडणारे माजी ऊर्जामंत्री तसेच प्रदेश महासचिव चंद्रशेखर बावनकुळे (Chandrasekhar Bavankule) यांनी अचानक मौन धारण केले आहे. महिनाभरापासून ते फारसे मीडियात दिसत नसल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे. तसेच याचे राजकीय अन्वयार्थ काढले जात आहे. (Chandrasekhar Bavankule suddenly silent)

भाजपच्या कार्यकाळात बावनकुळे ऊर्जामंत्री आणि नागपूर जिल्ह्याचे पालकमंत्री होते. नागपूरमध्ये असताना ते सातत्याने बैठका घेत तसेच पायाला चकरी लागल्याप्रमाणे दौरे करायचे. त्यांची प्रशासनावर चांगलीच पकड होती तसाच दरारासुद्धा होता. तुम्ही काम केले नाही तरी ५८ वर्षांपर्यंत पगार मिळेल.

हेही वाचा: राज्यातील 'या' जिल्ह्यात दुसऱ्यांदा वाढलीय कोरोना रुग्णसंख्या, ग्रामीण भागात सुमारे ८० टक्के रुग्ण

आम्हाला दर पाच वर्षांनी जनतेला हिशेब द्यायचा असतो असे थेट अधिकाऱ्यांना बैठकीतच सुनवायचे आणि काम लवकरात लवकर पूर्ण करण्यासाठी आग्रही असायचे. त्यामुळे अधिकारीसुद्धा त्यांना चांगलेच वचकून असायचे. सध्या कोरोनामुळे सुरू असलेल्या अनागोंदी कारभारात त्यांची अनेकांना आठवण होत आहे.

कोरोनाच्या पहिल्या लाटेत ते सातत्याने जिल्हा प्रशासनावर प्रहार करीत होते. ऊर्जा विभागाचा खडानखडा त्यांना माहिती आहे. कोरोनाच्या काळातील वाढीव वीज बिलाच्या विरोधात त्यांनी आंदोलन उभे केले होते. ऊर्जाखात्याची बारीकसारीक माहिती घेऊन महाविकास आघाडीला उघडे पाडण्याचे काम त्यांनी केले. महिनाभरापूर्वीपर्यंत ते चांगलेच सक्रिय होते. दर आठवड्यात पत्रकार परिषदा घेत होते. प्रत्येक विषयावर मीडियाला बाईट देत होते. असे असताना ते अचानक मीडियापासून लांब गेले. त्यांचा आवाज अचानक बंद होण्यामागे भाजपमधील अंतर्गत राजकारण असल्याची चर्चा दबक्या आवाजात सुरू आहे.

हेही वाचा: वर्धेत म्युकरमायकोसिसचा पहिला बळी; कोरोनावर केली होती मात

कोरोनामुळे परिस्थिती खराब आहे. मतदारसंघातील नागरिकांचा जीव वाचवणे सध्या महत्त्वाचे आहे. ही वेळ आरोप-प्रत्यारोपाचीसुद्धा नाही. मागील आठवड्यात देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत मराठवाड्याच्या दौऱ्यावर होतो. पक्षाचा महासचिव म्हणून काम सुरूच आहेत. बोलण्यासाठी अनेक विषय आहेत. ते योग्यवेळी मांडू.
- चंद्रशेखर बावनकुळे

(Chandrasekhar Bavankule suddenly silent)

loading image