कन्हान नगर परिषदेसाठी 9 जानेवारीला मतदान

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 11 डिसेंबर 2019

मंगळवारी निवडणूक आयोगाने निवडणुकीसाठी मतदार यादीचा कार्यक्रम देण्यात आला. अंतिम प्रभागनिहाय मतदार याद्या अधिप्रमाणित करून मंगळवारी प्रसिद्ध करून निवडणूक कार्यक्रम जाहीर केला. 

टेकाडी, (जि. नागपूर) :  कन्हान-पिपरी नगर परिषदेची सार्वत्रिक निवडणूक आज मंगळवारी जाहीर करण्यात आली. नगर परिषदेचे नगरसेवक व नगराध्यक्षपदासाठी 9 जानेवारीला मतदान होणार आहे. लगेच दुसऱ्या दिवशी 10 जानेवारीला निकाल जाहीर केला जाणार आहे. गुलाबी थंडीत होणारी ही निवडणूक चांगलीच राजकीय गरमी निर्माण करणार आहे.
 
19 फेब्रुवारीला कन्हान नगर परिषदेची मुदत संपणार असल्याने ही निवडणूक जाहीर कधी होणार याची कन्हानच्या नागरिकांत व राजकीय नेत्यांमध्ये उत्सुकता लागली होती. सार्वत्रिक निवडणुकीसाठी अध्यक्ष व सदस्यपदांसाठी प्रभाग रचना, आरक्षण सोडतीची प्रक्रिया पूर्वीच पार पडली आहे. आज मंगळवारी निवडणूक आयोगाने निवडणुकीसाठी मतदार यादीचा कार्यक्रम देण्यात आला. अंतिम प्रभागनिहाय मतदार याद्या अधिप्रमाणित करून मंगळवारी प्रसिद्ध करून निवडणूक कार्यक्रम जाहीर केला. 

असा आहे निवडणूक कार्यक्रम

सोमवार 16 डिसेंबरपासून निवडणूक प्रक्रिया सुरू होणार आहे. शुक्रवार 20 डिसेंबरपर्यंत नामनिर्देशन पत्र ऑनलाइन उपलब्ध होतील. तर याच कालावधीत नामनिर्देशन पत्र स्वीकारलेदेखील जातील. नामनिर्देशन पत्राची छाननी व वैध उमेदवारांची यादी शनिवार 21 डिसेंबरला सकाळी 11 वाजता प्रसिद्ध होईल. अपील नसल्यास नामनिर्देशन मागे घेण्यासाठी अंतिम तारीख शुक्रवार 27 डिसेंबर दुपारी 3 वाजेपर्यंत आहे. निवडणूक चिन्ह वाटप आणि उमेदवारांची अंतिम यादी उमेदवारी परत घेण्याच्या तारखेच्या दुसऱ्या दिवशी 28 डिसेंबरला प्रसिद्ध करण्यात येईल. मतदान गुरुवार 9 जानेवारीला सकाळी 7.30 ते संध्याकाळी 5.30 पर्यंत होणार आहे. 10 जानेवारीला मतमोजणी व निकाल जाहीर केला जाईल. 

मतदार कुणाला देणार कल

कन्हान नगर परिषदेवर भाजपने पाच वर्षे सत्ता गाजवली. ज्यात स्थानिक नागरिकांना विकासापासून वंचित ठेवल्याचे अनेक आरोप-प्रत्यारोप वेगवेगळ्या माध्यमातून झाले. अशात विकासाच्या अजेंड्यावर पहिल्याच नगर परिषदेवर सत्ता स्थापण्याचा मान मिळविलेल्या भाजपकडे नव्याने सत्ता स्थापन करण्याचा मान जनता देणार की सत्ताबदल होणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Announcement for Kanhan City Council Election