esakal | संतापजनक! आरोपींना वाचविण्याचा अजनी पोलिसांचा प्रयत्न
sakal

बोलून बातमी शोधा

file photo

संतापजनक! आरोपींना वाचविण्याचा अजनी पोलिसांचा प्रयत्न

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

नागपूर : कारसमोरून दुचाकी नेल्याने चिडलेल्या चौघांनी युवकाला काठीने जबर मारहाण केली, तसेच ठार मारण्याची धमकी दिली. मात्र, अजनी पोलिसांनी युवकाला तीन तास पोलिस ठाण्यात बसवून ठेवल्यानंतर चौघांऐवजी दोघांवर अदखलपात्र गुन्हा (एनसी) दाखल केला. अजनी पोलिसांच्या या प्रतापामुळे पोलिस विभागाची प्रतिमा मलिन होत आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार विकी गोटाफोडे हा फोटो स्टुडिओ चालवतो. सोमवारी सकाळी 11 वाजता दुचाकीने तो दुकानातून बाहेर पडला. रस्ता ओलांडताना आरोपी भंगार विक्रेता रतन पाटील हा मुलगा अमोल पाटील, जावई प्रवीण आणि महिलेसह कारने जात होता. कारसमोरून गेल्यामुळे दुचाकीचालक विकीशी वाद घातला. रतन व अमोल या बापलेकांनी विकीला मारहाण करण्यास सुरुवात केली. अमोलने काठीने तर महिलेसह अन्य तिघांनी लाथाबुक्‍क्‍यांनी मारहाण केली. अमोलने "काही दिवसांतच तुझा गेम करतो', अशी धमकी दिली.
जिवाला धोका असल्यामुळे विकी लगेच अजनी पोलिस ठाण्यात गेला. मात्र, अजनी पोलिसांनी तीन तास त्याला बसवून ठेवले. सुरुवातीला तक्रार घेण्यास टाळाटाळ केली, असा दावा तक्रारदार विकीने केला. त्यानंतर पोलिसांनी "एनसी' दाखल करून विकीची बोळवण केली. अमोल ठार मारेल, अशी भीती असल्यामुळे विकी हा डीसीपी निर्मला देवी यांच्याकडे गेले. मारहाणीचा व्हिडिओ अजनी पोलिसांना दाखविला तरीही ते कारवाई करण्यासाठी टाळाटाळ करीत होते, असा आरोप विकीने केला.

loading image
go to top