कोणतीही कला सर्वश्रेष्ठ आणि अनमोल असते : पंडित प्रशांत गायकवाड

कोणतीही कला सर्वश्रेष्ठ आणि अनमोल असते : पंडित प्रशांत गायकवाड

आर्वि (वर्धा) : संगीत ही अशी कला आहे ती पैसे देऊन शिकता येत नाही. ती समर्पण भावनेनेच पूर्णपणे शिकता येते. मात्र आज समर्पणाची भावना राहिलेली दिसत नाही. संगीत ही कला आहे, कला कोणतीही असो ती सर्वश्रेष्ठ असते त्याचे मोल नसते ती अनमोल असते हे विसरता कामा नये. असे प्रतिपादन प्रसिद्ध तबलावादक पंडित प्रशांत गायकवाड यांनी केले. येथील विश्रामगृहात सामाजिक कार्यात अग्रेसर असणाऱ्या मल्हार फिल्मचे अक्षय अहिव यांनी आयोजिक सवांद कार्यक्रमा दरम्यान झालेल्या पत्रकार परिषदेत गायकवाड बोलत होते.

यावेळी आचार्य विनोबा भावे ग्रामीण रुग्णालयाचे डीन डॉक्टर श्याम सुंदर भूतड़ा, मदत सामाजिक संस्थेचे अनिल जोशी, विजय अजमीरे, शक्ति गोरे, राजेश सोलंकी, आदींनी या कार्यक्रमाला उपस्थित होते.

बनारस घराणेशाही उत्तम तबलावादक घडविते त्याचीच परंपरा पुढे चालवणारे नामवंत तबलावादक पंडित प्रशांत गायकवाड यांनी 14 दिवस म्हणजे तब्बल तीनशे चोवीस तास तबलावादन करून त्यांचे गुरु पंडित किशनजी महाराज यांना श्रद्धांजली अर्पण केली होती. याची नोंद 'गिनीज वर्ल्ड बुकात' करण्यात आली आहे. पंडित प्रशांत यांचे वडील मनोहर गायकवाड यांनी त्यांचा व्यवसाय जेव्हा स्वतंत्रपणे सुरू केला तेव्हा त्यांनी बनवलेला पहिला हार्मोनियम राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांना भेट देऊन त्यांचे आशीर्वाद घेतले होते. अजित कडकडे, भारतरत्न पंडित भीमसेन जोशी यासारख्या मोठ्या कलावंतासोबत त्यांचीसाथ संगत होती.

भारतीय विद्या भवन नागपूर येथे प्रशांत गायकवाड यांनी तबला शिक्षकाची नोकरी मिळाली. तिथून आयुष्याला वेगळे वळण मिळाले. विश्वविख्यात तालाचार्य पद्मविभूषण पंडित किशन जी महाराज हे त्यांचे गुरू होय. बनारसला जाऊन तबलावादनातील अनेक बारकावे पंडित प्रशांत शिकले. बनारसी गत, परण फर्द कायदे, पटल उठान असे धडे गुरूनी दिले. 5 मे 2008 पंडित किशनजी महाराज यांनी या जगाचा निरोप घेतला 19 एप्रिल ते 2 मे 2009 पर्यंत 14 दिवस 324 तास त्यांनी तबला वादन करून गुरूला श्रद्धांजली वाहिली आणि  नवा विश्वविक्रम करून दाखविला.
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com