

Moringa Green Tea
sakal
नागपूर : आधुनिक शेतीची कास धरीत शेवग्याची शेती केली. उत्पादनाला बाजारात योग्य दर मिळत नसल्याने प्रयोग फसल्याची अपर्णा वानखेडे यांना जाणीव झाली. मात्र, प्रयत्न सोडले नाही. विज्ञान केंद्रातून ग्रीन टी तयार करण्याचे पाच वर्षापूर्वी प्रशिक्षण घेत उत्पादन सुरू केले. आज संकल्प स्वयंसहायता महिला बचत गटाचा ‘वानखेडे मोरिंगा डीप ग्रीन टी’ ब्रँड म्हणून उदयास येत आहे.