esakal | डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाच्या अशासकीय सदस्यांची नियुक्ती रद्द
sakal

बोलून बातमी शोधा

pdkv

डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाच्या अशासकीय सदस्यांची नियुक्ती रद्द

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

अकोला : राज्यातील कृषी शिक्षण संस्था, कृषी विद्यापीठ आणि सेवा प्रवेश मंडळावर नियुक्त करण्यात आलेल्या अशासकीय सदस्यांची नियुक्ती रद्द करण्याचा आदेश गुरुवारी (ता.5) राज्य शासनातर्फे काढण्यात आला. त्यानुसार अकोला येथील डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठावर नियुक्ती करण्यात आलेल्या सहा अशासकीय सदस्यांच्या नियुक्तीही रद्द झाल्या आहेत.

राज्यात महाविकास आघाडीचे सरकार आल्यानंतर पूर्वीच्या सरकारकडून नियुक्त करण्यात आलेल्या विविध महामंडळ, मंडळ व इतर संस्थांवरील नियुक्त्या रद्द करण्याचे आदेश काढले जात आहे. त्याच क्रमानुसार गुरुवारी डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठासह राज्यातील चारही कृषी विद्यापीठातील अशासकीय सदस्यांच्या नियुक्ती रद्दचा आदेश काढण्यात आला. या आदेशानुसार डॉ. पंदेकृवि अकोला येथे नियुक्त करण्यात आलेले अशासकीय सदस्य जैनुद्दीन जव्हेरी, गणेश कंडारकर, विनायक सरनाईक, मोरेश्‍वर वानखेडे, स्नेहा हरडे आणि डॉ. अर्चना बारब्दे यांचे सदस्यत्व रद्द झाले आहे.


परिषदेवरील सदस्यपदही रद्द
महाराष्ट्र राज्य कृषी शिक्षण व संशोधन परिषद पुणे येथील कार्यकारी परिषदेवर नियुक्त करण्यात आलेले अशासकीय सदस्य यांच्या नियुक्तीही रद्द करण्यात आल्यात. त्यानुसार डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठातर्फे नियुक्त अशासकीय सदस्य मोरेश्‍वर वानखेडे यांची नियुक्तीही रद्द झाली आहे.

loading image