पेट का सवाल है! या कलावंतांनी जगावे तरी कसे?

bhajan
bhajan

अर्जुनी मोरगाव (गोंदिया) : पूर्व विदर्भात खऱ्या अर्थाने कलावंतांची खाण आहे. झाडीपट्टी आणि कला यांचे अतुट नाते आहे. धार्मिक, सांस्कृतिक कार्यक्रमात आपल्या सुरेल आवाजाने सगळ्यांची मने जिंकणारा भजनी कलाकार गेल्या पाच महिन्यांपासून उपासमार सहन करीत आहे. दरम्यान, शासनस्तरावर रोजगाराचा प्रश्‍न मिटविण्यात यावा, अशी मागणी भजनी कलाकारांनी केली आहे.

ग्रामीण भागांतील कलावंत नाटक, जलसा, चित्रपट, दंडार, तमाशा, डहाके, गोंधळ, कीर्तन, कवीसंमेलन, नकला, संगीतमय कार्यक्रम आणि भजन अशा सगळ्याच कलांमध्ये पारंगत आहे. मात्र या कलाकारांचे प्रामुख्याने सध्याच्या परिस्थितीत मोठे हाल आहेत.

कलावंताची ही हाल-अपेष्टा दूर करण्यासाठी अनेक संघटना स्थापन करण्यात आल्या. या संघटनांच्या माध्यमातून मोर्चे काढण्यात आले. पण या हौशी कलावंतांची आतापर्यंत कोणीही दखल घेतली नाही. कोरोनाचे वाढते संकट मनाला हतबल करीत आहे. ज्या कलाकारांचे पोट या कलेवर आहे, अशा कलावंताचे काय हाल होत असतील हा मोठा विचार करण्यासारखा प्रश्‍न आहे. अनेक संस्था व संघटनांकडून मुख्यमंत्री, सांस्कृतिकमंत्री व पालकमंत्री यांना निवेदन देण्यात आले. परंतु, अद्याप काहीही उपाययोजना झाल्या नाहीत.

पोळ्यापासून नाट्य कलाकारांची वडसा नगरीत तालीम सुरू होत असे. गणपती व दुर्गा उत्सवाला गावातील हौशी कलाकारांचे नाटकाचे प्रयोग सुरू व्हायचे, संगीतमय भजनी कलावंतांचे श्रीकृष्ण जन्मोत्सवापासून भजन असायचे. दंडार व नकलाकारांचेही प्रयोग या दरम्यान रंगायचे, पण करोनाने कलाकारांच्या तोंडातील घासच हिरावला आहे. अशावेळी कलाकारांनी "जगावे की मरावे" असा प्रश्न आहे. कलावंताची शासनाने दखल घेणे आवश्‍यक आहे. एकतर सांस्कृतिक कार्यक्रम सुरू करावे, नाहीतर मानधन तरी लवकरात लवकर सुरू करावे, अशी मागणी भजनी कलाकारांनी केली आहे.

उपासमारीची वेळ
कोरोनामुळे सर्वच सांस्कृतिक कार्यक्रमांवर बंदी आहे. त्यामुळे उपासमारीची वेळ आली आहे. जगावे कसे? असा प्रश्‍न दररोज निर्माण होत आहे.
मुन्नाभाई नंदागवळी, कवी व कलावंत.

कोरोनाने समस्या
यंदा आमच्या भजन मंडळाचा कुठलाही कार्यक्रम झाला नाही. या दिवसात चांगले कार्यक्रम लागायचे. पण कोरोनाने खूप समस्या निर्माण झाली आहे.
चंद्रभान नाईक, भजनी कलावंत, कुंभीटोला

संपादन - स्वाती हुद्दार

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com