लघुपटाच्या नायिकेनेच लावला निर्मात्याला लाखोंचा चुना 

short film
short film

अमरावती ः शहरातील एका डॉक्‍टरला तिने भावनिक आवाहन करून त्यांच्याकडून सात लाख ७९ हजार रुपये हडपल्याप्रकरणाचे धागेदोरे गुजरातसोबत जुळले असल्याची माहिती सायबर पोलिसांच्या प्राथमिक तपासातून पुढे आली. 

अमरावतीच्या गणेशनगरातील रहिवासी डॉक्‍टर महिनाभरापूर्वीच आरोग्य विभागातून निवृत्त झाले. बऱ्याच दिवसांपासून त्यांच्या डोक्‍यात महिला अत्याचारासंदर्भात एक लघुचित्रपट तयार करण्याचा प्लॅन तयार होता. परंतु त्या चित्रपटातील एका दृश्‍यासाठी एका महिलेची आवश्‍यकता होती. सोशल मीडियावर डॉक्‍टरांनी सर्चिंग सुरू केले. एका महिलेने त्यांना त्यासाठी लॉकडाउन सुरू असताना मे महिन्यातच सहमती दर्शविली. 

सोशल मीडियावरून झालेल्या ओळखीनंतर त्या महिलेचा मोबाईलनंबर डॉक्‍टरांनी मिळविला. त्यांच्यात बऱ्याच दिवसांपर्यंत चॅटिंग सुरू होते. त्या महिलेने आपण कोविड महामारीत अडकली असून, उपचारासाठी तर कधी शस्त्रक्रिया करण्याचे कारण पुढे करून डॉक्‍टरांकडून लाखो रुपये हडपले. आपल्या लघुचित्रपटातील नायिका नाराज होऊ नये म्हणून डॉक्‍टरनेसुद्धा तिला फोन पेवरून वारंवार पैसे पाठविले. 

ज्या फोनवरून संपर्क साधला तो फोन गुजरातच्या एका व्यक्तीच्या नावावर असल्याची माहिती तपास यंत्रणेच्या हाती लागली. परंतु हनिट्रॅपचे जाळे रचणाऱ्या त्या नायिकेचा गुजरातच्या व्यक्तीसोबत नेमका काय संबंध आहे, हे समजू शकले नाही. पोलिस याप्रकरणी आवश्‍यक माहिती प्राप्त झाल्यानंतर चौकशीसाठी गुजरात येथे जातील, असे तपास अधिकाऱ्यांनी सांगितले. 

दुर्दैव! शेततळ्यात अंघोळ करणे मुलांना भोवले, दोघांचा बुडून मृत्यू

सोशल मीडियावरून अनोळखी व्यक्तीने केलेल्या भावनिक आवाहनास अनेकजण बळी पडतात. अशाप्रसंगी जागरूक राहून योग्य निर्णय घेणेच फायद्याचे ठरते. 
- प्रवीण काळे, पोलिस निरीक्षक सायबर ठाणे, अमरावती. 

संपादन ः राजेंद्र मारोटकर 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com