
अविनाश साबापुरे
यवतमाळ : महाराष्ट्रातील शिक्षणाची वार्षिक स्थिती मांडणारा ‘असर’चा अहवाल २८ जानेवारीला जाहीर झाला. त्यात विदर्भातील शाळांची शैक्षणिक दुरवस्था पुन्हा एकदा पुढे आली आहे. प्राथमिक शाळांमध्ये शिकणाऱ्या अर्ध्याअधिक विद्यार्थ्यांना वाचन आणि गणितात गती नसल्याचे पुढे आले आहे. त्यामुळे ही स्थिती सुधारण्यासाठी शिक्षण विभागाने पावले उचलण्याची गरज निर्माण झाली आहे.