esakal | अशोक चव्हाण कडाडले; तुम्ही सरकार पाडून दाखवा, आम्ही महाविकासआघाडीची ताकद दाखवू
sakal

बोलून बातमी शोधा

Ashok Chavans call to overthrow the government

विरोधकांना बोलण्यासाठी कुठलाही मुद्दा नाही. त्यामुळेच सरकार पडेल अशा वावळ्या विरोधकाडून उठविले जात आहे. सरकार पाडण्यासाठी विरोधक केवळ तारीख देण्यातच मग्न आहेत. त्यांनी सरकार पाडून दाखवावेच, त्यांना महाविकासआघाडीची ताकद दाखवू अशा दम राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोकराव चव्हाण यांनी दिला.

अशोक चव्हाण कडाडले; तुम्ही सरकार पाडून दाखवा, आम्ही महाविकासआघाडीची ताकद दाखवू

sakal_logo
By
चेतन देशमुख

यवतमाळ : सत्तेत राहून केवळ मौजमजा करायची नाही. सर्वसामान्यांचे काम तसेच कार्यकर्त्यांना बळ देण्यासाठी महाविकासआघाडी स्थापन झाली आहे. विरोधकांनी कितीही आगडोंब केली तरी पाच वर्ष महाविकासआघाडीची सरकार राहील. त्यांनी सरकार पाडून दाखवावे, आम्ही महाविकासआघाडीची ताकद दाखवू असा इशारा राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांनी भाजपचे नाव न घेता विरोधकांना दिला.

शनिवार (ता. ३१) जिल्हा काँग्रेस कमिटीतर्फे एमडब्यू पॅलेस येथे आयोजिच काँग्रेस कार्यकर्ता मेळाव्यात ते बोलत होते. महाविकासआघाडी कडून सर्वसामान्यांच्या प्रश्‍नाला न्याय देण्याचे काम सुरू आहे. शेतकऱ्यांपासून तर बेरोजगारापर्यंत सर्वांना हे सरकार मदत करीत आहे.

जाणून घ्या - संशय अखेर ठरला खरा; कोरोनाबाधितांसह मृत्यूच्या आकडेवारीतील घोळ सिद्ध

विरोधकांना बोलण्यासाठी कुठलाही मुद्दा नाही. त्यामुळेच सरकार पडेल अशा वावळ्या विरोधकाडून उठविले जात आहे. सरकार पाडण्यासाठी विरोधक केवळ तारीख देण्यातच मग्न आहेत. त्यांनी सरकार पाडून दाखवावेच, त्यांना महाविकासआघाडीची ताकद दाखवू अशा दम राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोकराव चव्हाण यांनी दिला.

यावेळी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष तथा राज्याचे महसूल मंत्री बाळासाहेब थोरात, ऊर्जामंत्री नितीन राऊत, महिला व बालकल्याण मंत्री यशोमती ठाकूर, मदत व पुर्नवर्सन मंत्री विजय वड्डेटीवार, नितीन कुंबलकर, आशीष दुआ, माजी मंत्री माणिकराव ठाकरे, खासदार बाळू धानोरकर, शिवाजीराव मोघे, वसंतराव पुरके, सचिन नाईक, वामनराव कासावार, जिल्हाध्यक्ष वझाहत मिर्झा, सध्या सव्वालाखे, माजी जिल्हा परिषद अध्यक्ष राहूल ठाकरे, जिल्हा परिषदेचे अर्थ व बांधकाम सभापती राम देवसरकर, माजी आमदार विजय खडसे, माजी जिल्हा परिषद उपाध्यक्ष बाळासाहेब मांगुळकर आदी उपस्थित होते.

अधिक माहितीसाठी - सहा वर्षीय चिमुकलीला कॅन्सरसारखा दुर्धर आजार; हतबल बापाचा मुलीला वाचविण्यासाठी संघर्ष

भाजपचे नाव न घेता आव्हान

काही दिवसांपूर्वीच दसरा मेळ्यावात राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी भाजपला थेट आव्हान केले होते. त्यानंतर आता माजी मुख्यमंत्र्यांनीही तशाच पद्धतीने भाजपचे नाव न घेता आव्हान दिले आहे.

संपादन - नीलेश डाखोरे

loading image
go to top