esakal | शिवसेनेला विदर्भाशी काही देणे-घेणे नाही; लबाड लोकांची फौज
sakal

बोलून बातमी शोधा

शिवसेनेला विदर्भाशी काही देणे-घेणे नाही; लबाड लोकांची फौज

शिवसेनेला विदर्भाशी काही देणे-घेणे नाही; लबाड लोकांची फौज

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

हिंगणघाट (जि. वर्धा) : हिंगणघाट विधानसभा तसेच जिल्ह्याच्या राजकारणात अशोक शिंदे (Ashok Shinde) यांचा ३० वर्षांपासून दरारा आहे. ते शिवसेनेचे उपनेते होते. तसेच ते शिवसेनेकडून तीनवेळा विधानसभेवर निवडणूक गेले (join Congress party) होते. शिवाय युती काळात त्यांनी राज्यमंत्री पदही भूषविले आहे. जिल्ह्याच्या राजकारणात संपर्कप्रमुख म्हणून माजी खासदार अनंत गुढे यांचा प्रवेश झाल्यानंतर या दोघात वर्चस्वावरून वाद वाढला होता. (Ashok-Shinde-left-ShivSena-and-joined-Congress)

जिल्ह्यातील शिवसेनेच्या निर्णयात अशोक शिंदे यांना डावलण्याचा प्रकार सुरू झाला. अलीकडेच भाजपमधून ११ नगरसेवकांनी शिवसेनेत प्रवेश घेतला होता. ही बाब माजी आमदार शिंदे यांच्यापासून दूर ठेवण्यात आली होती. याकारणाने नाराज असलेल्या माजी आमदार शिंदे यांनी काँग्रेसचा हात धरला. स्थानिक विधानसभा क्षेत्रात काँग्रेसही अनुभवी नेतृत्वाच्या शोधात होती.

हेही वाचा: नागपूरच्या भावेशची ‘इंडिया बुक’मध्ये नोंद; चतुष्कोन पूर्ण

शिवसेनेचे उपनेते व माजी आमदार अशोक शिंदे यांनी शिवसेनेला जय महाराष्ट्र करून काँग्रेस पक्षात अधिकृत प्रवेश घेतला आहे. मुंबई येथील काँग्रेसच्या टिळक भवनात काँग्रेसचे प्रदेश अध्यक्ष नाना पटोले यांच्या उपस्थितीत त्यांनी शिवबंधन तोडून काँग्रेसचा झेंडा हाती घेतला. माजी आमदार अशोक शिंदे यांच्या काँग्रेस प्रवेशाने काँग्रेसला बळ मिळाले आहे.

शिवसेनेला विदर्भाशी काही देणे-घेणे नसल्याचे दिसून येते. लबाड लोकांची फौज शिवसेनेत तयार झालेली आहे. यात आपली घुसमट होत होती. म्हणून मी शिवसेनेचा त्याग करून काँग्रेसमध्ये प्रवेश घेण्याचा निर्णय घेतला.
- अशोक शिंदे, हिंगणघाट

(Ashok-Shinde-left-ShivSena-and-joined-Congress)

loading image