esakal | नागपूरच्या भावेशची ‘इंडिया बुक’मध्ये नोंद; दुचाकीने सहा हजार किमीचा सुवर्ण चतुष्कोन पूर्ण
sakal

बोलून बातमी शोधा

नागपूरच्या भावेशची ‘इंडिया बुक’मध्ये नोंद; चतुष्कोन पूर्ण

नागपूरच्या भावेशची ‘इंडिया बुक’मध्ये नोंद; चतुष्कोन पूर्ण

sakal_logo
By
नरेंद्र चोरे

नागपूर : उपराजधानीतील युवा बाईक रायडर भावेश साहूने (Bike rider Bhavesh Sahu) दुचाकीने चार दिवसांत तब्बल सहा हजार किमी अंतर यशस्वीरित्या पूर्ण करीत प्रतिष्ठेच्या ‘इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड्स’मध्ये (India Book of Records) आपले नाव नोंदविले आहे. असा बहुमान मिळविणारा तो नागपूर व विदर्भाचा पहिला रायडर (The first rider of Nagpur and Vidarbha) ठरला आहे. (Bhavesh-of-Nagpur-recorded-in-the-India-Book-of-Records)

बिहारमध्ये जन्मलेल्या २५ वर्षीय भावेशने मार्चमध्ये लागोपाठ चार दिवस ‘नॉनस्टॉप' बाईक चालवत दिल्ली, कोलकाता, चेन्नई, मुंबईमार्गे परत दिल्ली असा सहा हजार ४४ किमीचा सुवर्ण चतुष्कोण (गोल्डन कॉड्रीलॅटरल) ९१ तासांत पूर्ण करून अनोखा विक्रम केला होता. त्याच्या या विक्रमाची नोंद नुकतीच ‘इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड्स’मध्ये झाली असून, तसे प्रमाणपत्रही त्याला प्राप्त झाले आहे.

हेही वाचा: नाना पटोले अपघातग्रस्ताच्या मदतीला धावतात तेव्हा...

याआधीचा ८७ तास ४२ मिनिटांचा विक्रम मुंबईच्या शोबित सरकारच्या नावावर होता. भावेशने हे साहसी अभियान ७५ तासांच्या आत पूर्ण केले असते तर, त्याचे नाव ‘लिम्का बुक ऑफ रेकॉर्ड्स’मध्येही नोंदले गेले असते. दुर्दैवाने मार्गात दुचाकी खराब झाल्याने त्याचे ‘लिम्का बुक’चे स्वप्न अपूर्ण राहिले. एमबीएपर्यंत शिक्षण घेतलेल्या भावेशने अभियानाची सुरुवात दिल्ली येथून २८ मार्च रोजी केली होती.

दिवसरात्र बाईक प्रवासादरम्यान भावेशने कुठेही मुक्काम न करता १३ राज्यांतील एकूण ८२ शहरांमधून बाईक चालविली होती. त्याने खाणेपिणेही चालत्या बाईकवरच केले होते. या अभियानाच्या निमित्ताने त्याने भारतीयांना हेल्मेट घालण्याचा व सुरक्षित वाहने चालविण्याचा संदेश दिला. भावेशने दुचाकीने आतापर्यंत डझनभर राईड्सच्या माध्यमातून ४४ हजार किमी अंतर कापले असून, भूतान, लडाख, नेपाळ व म्यानमार सीमेपर्यंत बाईक रायडिंग केले आहे.

हेही वाचा: सेना, राष्ट्रवादींवर पटोलेंचे आरोप, नंतर घुमजाव; म्हणाले...

प्रतिष्ठेच्या ‘इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड्स’मध्ये नोंद होणे, ही माझ्यासाठी अत्यंत आनंद व अभिमानाची बाब आहे. भविष्यात आणखी नवनवीन साहसी मोहिमा पूर्ण करून उपराजधानीला नावलौकिक मिळवून देण्याचा माझा प्रयत्न राहणार आहे.
- भावेश साहू, बाईक रायडर

(Bhavesh-of-Nagpur-recorded-in-the-India-Book-of-Records)

loading image