esakal | आश्रमशाळा अधीक्षकाने शाळेत घेतला गळफास 
sakal

बोलून बातमी शोधा

suicide

चंद्रपूर जिल्ह्याच्या शेवटच्या टोकावर असलेल्या जिवती तालुक्‍यातील पिट्टीगुडा येथील खेमाजी नाईक आश्रमशाळेतील अधीक्षक सुभाष पवार यांनी शाळेच्या आवारात गळफास घेऊन आत्महत्या केली.

आश्रमशाळा अधीक्षकाने शाळेत घेतला गळफास 

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

चंद्रपूर : जिवती तालुक्‍यातील पिट्टीगुडा येथील आश्रमशाळेच्या अधीक्षकाने शाळेच्या आवारात गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना बुधवारी (ता. 25) उघडकीस आली. सुभाष पवार (वय 42) असे आत्महत्या करणाऱ्या अधीक्षकाचे नाव आहे. 

संस्थाचालकांच्या जाचाला कंटाळून आत्महत्या केल्याचा आरोप

चंद्रपूर जिल्ह्याच्या शेवटच्या टोकावर असलेल्या जिवती तालुक्‍यातील पिट्टीगुडा येथील खेमाजी नाईक आश्रमशाळेतील अधीक्षक सुभाष पवार यांनी शाळेच्या आवारात गळफास घेऊन आत्महत्या केली. संस्थाचालकांच्या जाचाला कंटाळून आत्महत्या केल्याचा आरोप मृताच्या नातेवाइकांनी केला आहे. आत्महत्येची घटना उघडकीस येताच गावकऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली.

अवश्‍य वाचा- मूर्तीजापूरच्या जया, निकिता बनल्या न्यायाधीश 


संतप्त जमावाकडून मुख्याध्यापकाला मारहाण 

त्यानंतर संतप्त जमावाने शाळेचे मुख्याध्यापक लोकचंद राठोड यांना मारहाण केली. त्यानंतर राठोड यांनी स्वतःची जमावाच्या तावडीतून कशीबशी सुटका करीत घटनास्थळापासून जवळच असलेले पोलिस ठाणे गाठले. पोलिस ठाण्यासमोर मोठ्या संख्येने गावकरी गोळा झाले होते. त्यामुळे काही काळ तणावाची स्थिती निर्माण झाली होती. दरम्यान, पोलिसांच्या हस्तक्षेपाने जमावाला शांत करण्यात आले. मुख्याध्यापक राठोड यांना उपचारासाठी गडचांदूर येथील रुग्णालयात हलविण्यात आल्याची माहिती आहे. 
 

loading image
go to top