टक्का घसरला, धक्का कुणाला?

सकाळ वृत्तसेवा
Tuesday, 22 October 2019

नागपूर : जिल्ह्यात मतदानाचा टक्का घसल्याने अनेकांची धाकधूक वाढली आहे. यामुळे कोणाचे विजयाचे गणित बघडते हे गुरुवारच्या मतमोजणीतून पुढे येणार असून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह तब्बल 146 उमेदवारांचे भाग्य ईव्हीएम बंद झाले आहे. यात शहरातील 84 उमेदवारांचा समावेश आहे. गुरुवारी (ता.24) सर्वांच्या भाग्याचा फैसला होणार आहे. रात्री उशिरा मिळालेल्या माहितीनुसार शहरात सरासरी 49.88 तर ग्रामीणमध्ये 62.62 टक्के मतदान झाले. 
मुख्यमंत्री जिल्ह्याचे असल्याने संपूर्ण राज्याचे लक्ष नागपूरकडे लागले आहे. शहरातून 84 तर ग्रामीणमधून 62 उमेदवार रिंगणात होते. 

मुख्यमंत्र्यांच्या मतदारसंघात फारसा उत्साह दिसून आला नाही. येथे यापूर्वीच्या तुलनेतही मतदान कमी झाले आहे. याचा फटका कोणाला बसेल हे आत्ताच सांगता येत नाही. मात्र, आमचे मते कमिटेड असून सर्वांनी मतदान केल्याचा दावा भाजपचा आहे. येथे सरासरी 49.51 मतदान झाले. कॉंग्रेसबहुल भागातील त्यातही गुडधे यांच्या जयताळा केंद्रावर फारशी गर्दी नव्हती. पश्‍चिम नागपूरमध्ये 48.45 टक्के मतदान झाले. येथे उच्चभ्रू वस्त्यांमध्ये उत्साह नव्हता. याचा फटका भाजपला बसण्याची शक्‍यता नाकारता येत नाही. याउलट या परिसरातील मध्यमवर्गीय, हिंदी भाषकांच्या वस्त्यांमधून मोठ्या प्रमाणात मतदान झाले. ते ज्याच्याकडे जाईल तो विजयी होईल असा अंदाज वर्तविला जात आहे. येथे 48.45 टक्के मतदान झाले आहे. 
उत्तरमध्ये मोठ्या प्रमाणात मतदान होईल असा अंदाज वर्तविला जात होते. मात्र, येथेच सर्वाधिक संथ मतदान झाले. येथे सरासरी 50.71 टक्के मतदान झाले. बसप अपेक्षेनुसार चालल्याचा दावाही केला जात आहे. याचा धोका कॉंग्रेसला होण्याची शक्‍यता नाकारता येत नाही. मध्य नागपूरमध्ये मुस्लिम समाजाने कॉंग्रेसला भरभरून मतदान केले असले तरी यापैकी तीस टक्के मते एमआयएमकडे वळती झाली असावी असा अंदाज वर्तविला जात आहे. हलबा समाजाला दुसरा पर्याय नसल्याने ती भाजपला मिळाली. त्यामुळे बंटी शेळके यांचे भवितव्य धोक्‍यात दिसते. येथे 50.13 टक्के मतदान झाले आहे. पूर्व नागपूरमध्ये झोपडपट्ट्यांची संख्या सर्वाधिक असल्याने येथे सर्वाधिक मतदान होण्याची शक्‍यता होती. मात्र, 53.18 टक्केच मतदान झाले. सर्वाधिक चुरस दक्षिण नागपूरमध्ये होती. लढणारे सर्वच उमेदवार विजयाचा दावा करीत आहेत. शिवसेना, भाजप, व कॉंग्रेस अशी तीनही प्रमुख पक्षाच्या उमेदवारांनी येथे बंडखोरी केली होती. येथे फक्त 48.94 टक्केच मतदान झाल्याची आकडेवारी प्राप्त झाली आहे. त्यामुळे अनेकांची धाकधूक वाढली आहे. 

सरासरी टक्केवारी 
दक्षिण-पश्‍चिम : 49.25 
दक्षिण नागपूर : 48.94 
पूर्व नागपूर : 53.18 
मध्य नागपूर : 47.93 
पश्‍चिम नागपूर : 49.26 
उत्तर नागपूर : 50.72 
काटोल : 64.55 
सावनेर : 66.25 
हिंगणा : 57.15 
उमरेड : 68.00 
कामठी : 57.22 
रामटेक : 62.57 

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: assembly election, voting