सावरकरांच्या मुद्‌द्‌यावरून वातावरण तापले 

सकाळ वृत्तसेवा
Monday, 16 December 2019

राहुल गांधी यांना स्वातंत्र्यवीर सावरकर यांची देशभक्ती आणि स्वातंत्र्यासाठी भोगलेल्या यातना माहिती नाही. केवळ नाव गांधी आहे म्हणून कोणी महात्मा गांधी होऊ शकत नाही, असा टोलाही देवेंद्र फडणवीस यांनी रविवारी हाणला होता. 

नागपूर : स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या अपमानामुळे देशात संतापाची लाट उसळली आहे. सर्वच जण राहुल गांधी यांच्या वक्तव्याचा निषेध करीत आहेत. अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी भाजपच्या आमदारांनी सावरकरांच्या मुद्‌द्‌यावरून विधानभावन परिसरात आंदोलन केले. भाजपचे आमदार "मी सावरकर' अशी टोपी घालून आंदोलन करीत होते. 

सत्तेसाठी स्वातंत्र्यवीर सावरकर यांचा अपमान करणाऱ्यांसोबत शिवसेना मांडीला मांडी लाऊन बसली आहे. अशा लाचार महाविकास आघाडीच्या सरकारसोबत आम्हाला चहापान घ्यायचा नाही, असे सांगून माजी मुख्यमंत्री व विरोधीपक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी सरकाराच्या चहापानावर बहिष्कार असल्याचे रविवारी जाहीर केले होते. राहुल गांधी यांना स्वातंत्र्यवीर सावरकर यांची देशभक्ती आणि स्वातंत्र्यासाठी भोगलेल्या यातना माहिती नाही. केवळ नाव गांधी आहे म्हणून कोणी महात्मा गांधी होऊ शकत नाही, असा टोलाही देवेंद्र फडणवीस यांनी रविवारी हाणला होता. 

हेही वाचा - विधान परिषदेचे विरोधी पक्षनेता म्हणून भाजपने केली या नेत्याची निवड

सोमवारी भाजपचे आमदार "मी सावरकर' अशी टोपी घालून विधानभवन परिसरात दाखल झाले. सावरकरांच्या मुद्‌द्‌यावरून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व महाविकास आघाडी सरकारला कोंडीत पकडण्यासाठी माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, चंद्रकांत पाटीत यांच्या नेतृत्वात आंदोलन केले. "सावरकरांचा अपमान खपवून घेणार नाही', "राहुल गांधी यांनी माफी मागावी' अशा घोषण भाजपचे आमदार विधानभवन परिसरात देत होते. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: The atmosphere was heated by Savarkar's point