esakal | अनेक वर्ष प्रेमप्रकरण चालल्यानंतर प्रेयसीचे बदलले मन; न राहवल्याने प्रियकराने केले असे...
sakal

बोलून बातमी शोधा

Atrocities by threatening to make the photos viral at amravati

त्याने वारंवार प्रेयसीच्या सारसी भेटायला जाणे सुरू केले. तसेच आपल्यासोबत राहण्यासाठी गळ घातली. मात्र, तिने नकार दिला. चिडलेल्या विजेंद्रने लग्नापूर्वीचे फोटो आणि व्हिडिओ पतीला दाखवून सोशल मीडियावर व्हायरल करण्याची धमकी दिली व ब्लॅकमेल केले.

अनेक वर्ष प्रेमप्रकरण चालल्यानंतर प्रेयसीचे बदलले मन; न राहवल्याने प्रियकराने केले असे...

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

अमरावती : त्या दोघांचे प्रेम झाले... प्रेमात आकंठ बुडालेल्या दोघांनी विविध ठिकाणी फिरायला जात फोटो आणि व्हिडिओ काढले... लग्न करणार असल्याचे ते बिनधास्त होते... मात्र, एकेदिवशी प्रेयसीचे मन बदलले व दुसऱ्या युवकासोबत लग्न केले... प्रियकराने यातून स्वत:ला सावरण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्याला काही जमेना... यानंतर त्याने प्रेयसीच्या सासरी जाणे सुरू केले आणि अत्याचार केला. विजेंद्र रवींद्र पाटील (वय 32) असे आरोपी प्रियकराचे नाव आहे. 

अकोला जिल्ह्यातील जसानगर, रिदोरा येथील विजेंद्रचे काही वर्षांपासून एक युवतीवर प्रेम होते. ती युवतीही विजेंद्रवर प्रेम करीत होती. दोघेही घरच्यांना न सांगत बाहेर फिरायला जात होते. प्रेमाची आठवण म्हणून त्यांनी काही फोटो आणि व्हिडिओ काढले होते. मात्र, कुठे काय बिनसले की मुलीने विजेंद्रला लग्नास नकार दिला.

क्लिक करा -  मुंढे साहेब, हे अतिक्रमण काढण्याची हिंमत दाखवाच...

मुलीने नकार दिल्याने विजेंद्रला चांगलाच धक्‍का बसला. त्याने तिला समजविण्याचा भरपूर प्रयत्न केला. मात्र, ती काहीही ऐकण्याच्या स्थितीत नव्हती. अशातच तिने दुसऱ्या युवकासोबत लग्न केले. मात्र, विजेंद्र तिच्याच विचारात राहत होता. काही वर्षांनी ती एका मुलीची आई झाली. परंतु, विजेंद्रच्या मनात असलेले प्रेम कमी होत नव्हते. 

यामुळे त्याने वारंवार प्रेयसीच्या सारसी भेटायला जाणे सुरू केले. तसेच आपल्यासोबत राहण्यासाठी गळ घातली. मात्र, तिने नकार दिला. चिडलेल्या विजेंद्रने लग्नापूर्वीचे फोटो आणि व्हिडिओ पतीला दाखवून सोशल मीडियावर व्हायरल करण्याची धमकी दिली व ब्लॅकमेल केले. यातून विजेंद्रने तिच्यावर अत्याचार केला. 

विजेंद्रने तिला लग्नाचे आमिष देत मुलीचा सांभाळ करण्याची तयार दर्शवली. तसेच नोकरी लावून देण्याचे आमिष दाखविले. काही दिवसांनी तिने विजेंद्रला लग्नाची मागणी केली. मात्र, विजेंद्रने लग्न न करता शिवीगाळ करीत प्रेयसीला वाऱ्यावर सोडले. पीडितेच्या तक्रारीवरून नांदगावपेठ पोलिसांनी गुन्हा दाखल करीत विजेंद्र पाटीलला अटक केली.

सविस्तर वाचा - नागपूर विभागात 18 संशयित कोरोनाग्रस्तांवर डॉक्‍टरांची नजर, मास्कच्या विक्रीत वाढ

पतीपासून केले वेगळे

विजेंद्रने पूर्व प्रेयसीला लग्नापूर्वीचे फोटो आणि व्हिडिओ पतीला दाखवण्यासाची तसेच सोशल मीडियावर व्हायरल करण्याची धमकी केली. यामुळे घाबरलेल्या प्रेयसीने विजेंद्रचा अत्याचार सहन केला. काही दिवसांनी त्याने तिला पतीपासून वेगळे राहण्यास भाग पाडले. तिने लग्नाचा तागदा लावला असता वाऱ्यावर सोडून दिले.