कचऱ्याच्या वादातून निघाल्या तलवारी, चपराशीपुऱ्यात खुनाचा प्रयत्न

crime
crime

अमरावती : नांदगावपेठ परिसरात एकमेकांच्या शेजारी जनावरांचे गोठे असताना, कचरा फेकण्याच्या कारणावरून वाद झाला. हा वाद चपराशीपुऱ्यापर्यंत पोहोचून, रात्री प्राणघातक हल्ला करून खून करण्याचा प्रयत्न झाला. 

जुनेद अहमद कुरेशी (वय 27, रा. चपराशीपुरा) असे हल्ल्यातील गंभीर जखमीचे नाव असून, त्याच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहे. फ्रेजरपुरा पोलिसांनी अनिस खॉ मनसब खॉ कुरेशी (वय 61), सोहेल खॉं अनिस खॉं कुरेशी (वय 21) व शोएब खॉ अनिस खॉ कुरेशी (19, सर्व. रा. चपराशीपुरा) तिघांविरुद्ध गुन्हा दाखल करून त्यांना रात्रीच अटक केली. जुनेद कुरेशी व अनिस कुरेशी या दोघांचे जनावरांचे गोठे हे नांदगावपेठ परिसरात आहेत. 

शुक्रवारी (ता. 15) सायंकाळी पाचच्या सुमारास त्या दोघांमध्ये कचरा टाकण्याच्या कारणावरून आधी शाब्दिक वादातून भांडण झाले होते. हा वाद मिटल्यानंतर ते दोघेही चपराशीपुरा परिसरात घरी परतले. सायंकाळचा वाद पुन्हा रात्रीच्या सुमारास उफाळून आला. वडील बोलावित असल्याचा निरोप देऊन जुनेद अहमदला बाहेर बोलविले. बाहेर पडताच, नमूद तिघांनी, तलवारीसह सुऱ्यांनी हल्ला केला.

त्यात जुनेद गंभीर जखमी झाला. हल्ल्याच्या ठिकाणी चपराशीपुरा परिसरात पोलिस दल दाखल झाले. चौकशी करून यातील हल्लेखोरांना मध्यरात्रीच्या सुमारास अटक केली. तपास अधिकाऱ्यांनी शनिवारी (ता. 16) तिघांनाही न्यायालयासमोर हजर केले. खुनाचा प्रयत्न केल्याप्रकरणी तिघांविरुद्ध फ्रेजरपुरा ठाण्यात गुन्हा दाखल झाला. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com