esakal | पत्नी बनली रणचंडिका; पतीच्या प्रेयसीला धु..धु धुतले... वाचा काय झाले ते
sakal

बोलून बातमी शोधा

fight1

घरातील वादाला कंटाळून दोघेही विभक्‍त राहायला लागले. गेल्या काही महिन्यांपासून पती पंकजचे एका युवतीशी अनैतिक संबंध असून दोघेही एका फ्लॅटमध्ये सोबत राहत असल्याची माहिती अनुजाला मिळाली. अनुजाने तिचा पत्ता शोधण्यासाठी खूप आटापीटा केला. परंतु, तिच्या हाती निराशा आली.

पत्नी बनली रणचंडिका; पतीच्या प्रेयसीला धु..धु धुतले... वाचा काय झाले ते

sakal_logo
By
अनिल कांबळे

नागपूर : पती-पत्नीच्या सुखी संसारात "ती' आली आणि दोघांच्या संसारात मिठाचा खडा पडला. ती पतीपेक्षा जवळपास 12 वर्षांनी वयाने लहान आणि दिसायलाही सुंदर. तिच्या सौंदर्यावर पती भाळला. पत्नीला कुणकुण लागताच दोघांमध्ये सतत वाद होत होता. दोघांनीही वेगळे राहण्याचा निर्णय घेतला. "ती' थेट पतीसोबत राहायला लागल्यामुळे पत्नीची तळपायातील आग मस्तकात गेली. तिने पाच मैत्रिणींसोबत पतीच्या प्रेयसीचे घर गाठले आणि तिला हॉकी स्टिकने झोडपून काढले. हा सर्व प्रकार शुक्रवारी दुपारी दोन वाजता अजनीत घडला. 

पंकज आणि अनुजा (बदललेले नाव) हे दोघे पती-पत्नी असून त्यांचा 2016 मध्ये विवाह झाला होता. पंकज हा मुंबईतील शासकीय तेल कंपनीत मोठ्या हुद्‌द्‌यावर नोकरीवर आहे. त्यांना एक मुलगा असून लग्नाच्या दोन वर्षानंतर घरात छोट्या-मोठ्या गोष्टींवरून पती-पत्नीत वाद होत होते. दरम्यान, पतीचे एका युवतीसोबत प्रेमसंबंध असल्याचा संशय होता. त्याच कारणावरून दोघांत पुन्हा वादावादी होत होती. 

पत्नीविरूद्ध गुन्हा दाखल 
घरातील वादाला कंटाळून दोघेही विभक्‍त राहायला लागले. गेल्या काही महिन्यांपासून पती पंकजचे एका युवतीशी अनैतिक संबंध असून दोघेही एका फ्लॅटमध्ये सोबत राहत असल्याची माहिती अनुजाला मिळाली. अनुजाने तिचा पत्ता शोधण्यासाठी खूप आटापीटा केला. परंतु, तिच्या हाती निराशा आली. त्यामुळे तिने काही गुप्तहेर पेरून पतीच्या प्रेयसीची माहिती काढण्याचा प्रयत्न केला. थोडक्‍यात ती युवती चंदा (बदललेले नाव) हिच्याबाबत अनुजाला माहिती मिळाली. पतीच्या महिन्यातील अर्ध्याअधिक पगारावर चंदाच हात मारत असल्याचे तिच्या लक्षात आले. त्यामुळे चंदाला धडा शिकविण्याचा बेत अनुजाने आखला होता. 

केवळ फोटोवरून शोधले घर 
अनुजाने पेरलेल्या गुप्तहेरांनी पतीची प्रेयसी चंदाच्या घराचा फोटो मिळवला. ती हावरापेठमध्ये राहत असल्याची माहिती काढली. तो फोटो घेऊन अनुजाने संपूर्ण हावरापेठ पिंजून काढले. शेवटी तिला चंदाच्या बिल्डींगचा शोध लागला. तिच्या घराची दोन दिवस रेकी केली. ती कुठे जाते? सोबत कोण राहतो? ती कोणत्या मजल्यावर राहते? ही सर्व माहिती काढली. 

गडचिरोली ब्रेकिंग : जंगलात दबा धरून बसलेल्या नक्षलवाद्यांचा पोलिसांवर गोळीबार, चार जवान जखमी?

 
पतीच्या प्रेयसीची धुलाई 
अनुजाने पतीच्या प्रेयसीबाबत आपल्या चार मैत्रिणींना माहिती दिली. तिला धडा शिकवायला जायचे असल्याचे सांगितले. कटानुसार शुक्रवारी दुपारी दोन वाजता कारने त्या पाचही जणी चंदाच्या फ्लॅटवर आल्या. पतीसोबत असलेल्या अनैतिक संबंधावरून वाद घातला. पतीला सोडून देण्याची धमकी दिली. मात्र, चंदानेही मुजोरी केल्यामुळे अनुजाने चंदाला हॉकीस्टिकने जबर मारहाण केली.