यवतमाळमधील डॉक्टरांवर धारदार शस्त्राने हल्ला; गंभीर अवस्थेत नागपूरला हलविले

डॉ. मत्ते हे नेहमीप्रमाणे आज त्यांच्या क्‍लिनिकमध्ये रुग्ण तपासत होते. दुपारी 2 ते 3 हल्लेखोर रुग्ण बनून दवाखान्यात आले
डॉ. मत्ते हे नेहमीप्रमाणे आज त्यांच्या क्‍लिनिकमध्ये रुग्ण तपासत होते. दुपारी 2 ते 3 हल्लेखोर रुग्ण बनून दवाखान्यात आले
Updated on

वणी (जि. यवतमाळ)  : येथील यात्रा मैदान परिसरात सोमवारी (ता.5) दुपारी 1 वाजताच्या सुमारास 2 ते 3 हल्लेखोरांनी डॉ. पद्माकर मत्ते यांच्यावर धारदार शस्त्राने हल्ला चढविला. यात ते गंभीर जखमी झाले. त्यांच्यावर खासगी रुग्णालयात प्रथमोपचार करण्यात आले. प्रकृती गंभीर असल्याने त्यांना पुढील उपचारासाठी नागपूरला हलविण्यात आले आहे. त्यांच्यावर कुणी व का हल्ला केला, हे वृत्त लिहिपर्यंत कळू शकले नाही.

डॉ. मत्ते हे नेहमीप्रमाणे आज त्यांच्या क्‍लिनिकमध्ये रुग्ण तपासत होते. दुपारी 2 ते 3 हल्लेखोर रुग्ण बनून दवाखान्यात आले. त्यांना तपासणीसाठी आत बोलावले असता एकाने डॉक्‍टर यांच्या डोक्‍यावर डोळ्याजवळ धारदार शस्त्राने वार केला. त्यांची किंचाळी एकूण क्‍लिनिकच्यावर घरात असलेली त्यांची सून धावत खाली आली. तो पर्यंत हल्लेखोरांनी पोटावर व खांद्यावर सपासप वार केले. 

सूनबाईंनी लगतच ठेवलेला स्टूल हल्लेखोरांना मारला. अशातच हल्लेखोर दुचाकी (क्रमांक एम.एच.29, बी.जी.2950) सोडून पसार झाले. डॉ. मत्ते रक्ताच्या थारोळ्यात खाली कोसळले. यावेळी दवाखान्यात उपस्थित रुग्णांत चांगलीच खळबळ माजली. एका प्रत्यक्षदर्शीने तातडीने पोलिसांना सूचित केले. ठाणेदार वैभव जाधव यांनी घटनेचे गांभीर्य बघता घटनास्थळ गाठले. डॉ. मत्ते यांना प्रथम येथील खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. मात्र गंभीर स्वरूपाच्या जखमा असल्याने त्यांना पुढील उपचारासाठी नागपूरला हलविण्यात आले आहे. या घटनेमुळे जिल्ह्यातील वैद्यकीय क्षेत्रात खळबळ उडाली आहे.

काही दिवसांपूर्वी मारहाण

काही दिवसांपूर्वी डॉ. मत्ते यांच्या क्‍लिनिकमध्ये उपचारार्थ आलेल्या तरुणाचा मृत्यू झाला होता. त्यावेळी मृताच्या नातेवाइकांनी क्‍लिनिकवर हल्ला चढवित डॉक्‍टरला मारहाण केली होती. आणि आज चाकूहल्ला झाल्याने प्रकरणाची गुंतागुंत वाढली आहे. हल्लेखोरांना शोधण्याचे आव्हान पोलिसांसमोर आहे.

संपादन - अथर्व महांकाळ 
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com