Attack On Elderly Couple : रात्री ३ वाजता आला दरवाजाचा आवाज; दार उघडताच वृद्धाचा केला खून | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

murder

रात्री ३ वाजता आला दरवाजाचा आवाज; दार उघडताच वृद्धाचा केला खून

आरमोरी (जि. गडचिरोली) : अज्ञात व्यक्तीने वृद्ध दाम्पत्यावर धारदार शस्त्राने प्राणघातक हल्ला करून खून केल्याची घटना आरमोरी येथील तहसील कार्यालयासमोरील वस्तीत सोमवारी (ता. २२) रात्री दोन वाजताच्या सुमारास घडली. या हल्ल्यात वृद्ध व्यक्तीचा मृत्यू झाला असून, पत्नी गंभीर जखमी आहे. आरमोरी येथील रहिवासी गौतम ऋषी निमगडे (वय ६३) यांचा मृत्यू झाला, तर त्यांची पत्नी माया गौतम निमगडे (वय ६०) गंभीर जखमी आहेत. घटनेची तक्रार आरमोरी पोलिसांत करण्यात आली.

प्राप्त माहितीनुसार, गौतम निमगडे व पत्नी माया घरी झोपले असताना रात्री २ ते ३ वाजतादरम्यान अज्ञात व्यक्तीने दार वाजवले. गौतम निमगडे यांनी दरवाजा उघडला असता क्षणाचाही विलंब न लावता हातात असलेल्या शस्त्राने वृद्ध दाम्पत्याच्या डोक्यावर सपासप वार करून हल्लेखोर पळून गेले. जखमी अवस्थेत असलेल्या दाम्पत्यांनी हल्ला झाल्याची माहिती तळमजल्यावर राहत असलेल्या मुलाला दिली. मुलाने आरडाओरड करीत आई-वडिलांना आरमोरी येथील उपजिल्हा रुग्णालयात भरती केले. उपचारादरम्यान गौतम निमगडे यांचा मृत्यू झाला.

हेही वाचा: नरभक्षी म्हणाला, त्याची जीभ कापून तळली; परंतु, चव आवडली नाही

गंभीर जखमी माया गौतम निमगडे यांना ब्रह्मपुरी येथील खासगी रुग्णालयात उपचारासाठी भरती करण्यात आले. घटनेची तक्रार आरमोरी पोलिस ठाण्यात झाली असून, अज्ञात व्यक्तीवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी श्वान पथकाला पाचारण केले असून, घटनास्थळाचा पंचनामा करून फिंगर प्रिंट घेण्यात आले. पोलिस उपविभागीय अधिकारी प्राणील गिल्डा यांनी घटनास्थळी भेट दिली. पुढील तपास पोलिस निरीक्षक मनोज काळबांडे यांच्या मार्गदर्शनात सहायक पोलिस निरीक्षक पंकज बोडसे करीत आहेत.

loading image
go to top