नरभक्षी म्हणाला, त्याची जीभ कापून बटरमध्ये तळली; परंतु, चव आवडली नाही | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Jail

नरभक्षी म्हणाला, त्याची जीभ कापून तळली; परंतु, चव आवडली नाही

रशियामध्ये एका व्यक्तीच्या कारचा अपघात झाला. अपघातात त्या व्यक्तीच्या गाडीची डिक्की उघडी झाली. यानंतर डिक्कीतून मृतदेह पडला. त्या मृतदेहाचे डोके गायब होते. चौकशीत तो माणूस नरभक्षक असल्याचे निष्पन्न झाले. त्या माणसाला माणसांना मारून मांस खाणे आवडायचे. त्याने चौकशीत पोलिसांना काही घटना सांगितल्या. यामुळे सगळेच हादरले.

‘डेली मेल’च्या वृत्तानुसार, येगोर कोमारोव (२३) असे पोलिसांनी अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. त्याला सोरटावला शहरातून अटक करण्यात आली. त्याची कार बॅरिकेडला धडकली होती. या अपघातात त्याच्या कारची डिक्की उघडली गेली. यानंतर रस्त्यावर डोके नसलेला मृतदेह पडला. पोलिसांना पाहून त्याने घटनास्थळावरून पळून जाण्याचा प्रयत्न केला. मात्र, पोलिसांनी पाठलाग करून त्याला पकडले.

हेही वाचा: सेक्समुळे स्पेनचा समुद्रकिनारा झाला उद्ध्वस्त; आढळले २९८ स्पॉट

पोलिसांनी चौकशी केली असता कारमधून पडलेला मृतदेह सेंट पीटर्सबर्ग येथील ५० वर्षीय व्यावसायिकाचे असल्याचे त्याने सांगितले. पोलिसांना कोमारोवच्या कारमध्ये पत्ते, दोरी आणि पोत्या सापडल्या. कोमारोवसोबत कारमध्ये दोन मित्रही होते. वाद झाल्यानंतर तिघांनी व्यावसायिकाची हत्या केली. तिघेही व्यावसायिकाचा मृतदेह जंगलात पुरण्यासाठी जात होते. मात्र, वाटतच पकडले गेले.

कोमारोवचा जन्म सेंट पीटर्सबर्ग येथे झाल्याची माहिती रशियन माध्यमांनी दिली. तो आई-वडील आणि आजीसोबत अपार्टमेंटमध्ये राहतो. कोमारोवच्या साथीदाराचे नाव यान शचेपानोव्स्की आहे. तो पूर्व युक्रेनमधील लुहान्स्क येथून आला होता. तर तिसरा साथीदार कोमारोवसोबत राहत होता. तो त्याची कार चालवत असे. सध्या तिघेही पोलिसांच्या ताब्यात आहेत.

हेही वाचा: दारूसोबत चकणा म्हणून या पदार्थांचे तर सेवन करत नाही ना?

माणसांना मारायला आवडते

मला माणसांना मारायला आवडते. गेल्या वर्षी सेंट पीटर्सबर्गमध्ये ३८ वर्षीय व्यक्तीची हत्या केली होती. ३८ वर्षीय व्यक्तीचा मृतदेह जवळच्या नाल्यात टाकण्यापूर्वी त्याची जीभ कापून घरी नेली आणि बटरमध्ये तळली. परंतु, चव आवडली नाही.

नसांची चव आवडली नाही

व्यावसायिकाचे मांस खाता यावे म्हणून भोसकून हत्या केल्याचे कोमारोव याने पोलिसांना सांगितले. मृत्यूनंतर त्याची मान कापली आणि रक्त व मांस यांचा आस्वाद घेतला. परंतु, चाकूला धार नसल्यामुळे संपूर्ण शरीर कापता आले नाही. मला त्याच्या नसांची चव आवडली नाही.

loading image
go to top