esakal | स्वच्छता निरीक्षकावर हल्ला
sakal

बोलून बातमी शोधा

स्वच्छता निरीक्षकावर हल्ला

स्वच्छता निरीक्षकावर हल्ला

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा
नागपूर : मेडिकलमध्ये नुकतेच एका प्रशिक्षणार्थी डॉक्‍टरवर ब्लेडने हल्ला करून लुटल्याचे प्रकरण ताजे असताना शुक्रवारी रात्री मेडिकलमध्ये कार्यरत स्वच्छता व आरोग्य निरीक्षकावर हल्ला झाल्याची घटना घडली. यावरून मेडिकलमधील सुरक्षा यंत्रणा ढासळली असल्याचे पुढे येते. जखमी अवस्थेत स्वच्छता निरीक्षकावर मेडिकलमध्ये उपचार करण्यात आले असून अजनी पोलिसांनी गुन्हा नोंदविला आहे.
शुक्रवारी रात्री मेडिकलचे स्वच्छता निरीक्षक नरसिंग देवरवाड पेइंग वॉर्डाच्या बाजूला असलेल्या निवासी गाळ्यासमोर फिरत होते. त्यांच्या निवासी गाळ्याच्या मागे सार्वजनिक बांधकाम विभागाअंतर्गत काम करणारे मजूर झोपडी घालून येथे राहतात. त्यांच्या झोपडीतून जोरजोरात ओरडण्याचा आवाज ऐकू आल्याने देवडवार तेथे पोहचले. काय सुरू आहे, अशी विचारणा त्यांनी केली. तीन ते चार व्यक्ती येथे बसून होते. दारू पार्टी रंगली असल्याचे चित्र दिसून आले. दारूपार्टीचे बिंग फुटले असल्याने एकाने वीट उचलून ती देवरवाड यांच्या दिशेने भिरकावली. त्यांच्या चेहऱ्याला ती लागली. थोडक्‍यात डोळा वाचला. डोळ्यावर असलेला चष्मा खाली पडला. देवरवाड यांनी आरडाओरड करताच सारे आरोपी पळून गेले. या पार्टीत मेडिकलच्या क्ष-किरणशास्त्र विभागाचा तंत्रज्ञ सहाय्यक रॉबीन फिलिप्सही असल्याचे निदर्शनात आले. शनिवारी देवरवाड यांनी प्रथम वैद्यकीय अधीक्षक आणि अजनी पोलिस यांच्याकडे तक्रार केली. गुन्हा दाखल करण्यात आला. 
loading image
go to top