भरदिवसा व्यापाऱ्यावर हल्ला; साडेआठ लाख पळविले

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 15 ऑक्टोबर 2019

उमरेड : सोमवारी उमरेड शहरात सकाळी साडेअकराच्या सुमारास युनियन बॅंकेत ठेवी जमा करण्यासाठी गेलेल्या युवा व्यावसायिकांवर काही चोरांनी पाळत ठेवून हल्ला चढविला. चाकूने वार करून साडेआठ लाख रुपये असलेली बॅग पळविल्याची खळबळजनक घटना उघडकीस आली. 

उमरेड : सोमवारी उमरेड शहरात सकाळी साडेअकराच्या सुमारास युनियन बॅंकेत ठेवी जमा करण्यासाठी गेलेल्या युवा व्यावसायिकांवर काही चोरांनी पाळत ठेवून हल्ला चढविला. चाकूने वार करून साडेआठ लाख रुपये असलेली बॅग पळविल्याची खळबळजनक घटना उघडकीस आली. 
स्थानिक नामांकित किराणा व्यापारी नीलेश महेश तोलानी (वय 30, सिंधी कॉलनी उमरेड) यांचे व्यावसायिक कार्यालय खाती कामठी चौक परिसरात असून ते ठेवी जमा करण्याच्या उद्देशाने आठ लाख 53 हजार रुपयांनी भरलेली बॅग घेऊन दुचाकीने काही अंतरावर असलेल्या इतवारी बाजारपेठेतील युनियन बॅंकेच्या दिशेने निघाले. घटनेची चित्रफीत बॅंकेच्या बाहेर असलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली असल्यामुळे त्यानुसार ते बॅंकेजवळ पोचतात बॅग घेऊन जिना चढायला सुरुवात केली. तेवढ्यात मागावर असलेले तीन अज्ञात चोर व आधीच जिन्यावर चढून तयार असलेला एक अशा तिघांनी नीलेशवर क्षणार्धात चाकूने सपासप वार करून बॅग हिसकावून दुचाकीने धूम ठोकली. शहरातील काही सीसीटीव्ही कॅमेऱ्यांत चोरटे कैद झाले असून फोटो व व्हिडिओ प्रसारमाध्यमांद्वारे व्हॉट्‌सऍपमधून व्हायरल झाला. वृत्त लिहिस्तोवर पोलिसांनी गुन्हा नोंदविला नसल्याचे समजले. याशिवाय विधानसभा निवडणूक काही दिवसांवर येऊन ठेपली असल्यामुळे त्यात गुंतलेले पोलिस प्रशासन या घटनेमुळे सतर्क झाले असून पोलिस यंत्रणा तपासात लागल्याचेही समजले. पीडित व्यवसायिक नागपूरच्या एका खासगी रुग्णालयात उपचार घेत असल्याचे त्यांच्या नातेवाइकांकडून समजले. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Attacks on merchant, crime