मोठी बातमी : सलून व्यावसायिकाचा संयम सुटला, घेतला हा टोकाचा निर्णय...

Attempt of self-immolation by a salon professional in Bhandara
Attempt of self-immolation by a salon professional in Bhandara
Updated on

भंडारा : शासनाच्या आदेशाची अवहलेना करून सुरू असलेल्या दुकानांवर कारवाईसाठी गेलेल्या नगर परिषद पथकासमक्ष सलून व्यावसायिकाने अंगावर पेट्रोल टाकून आत्मदहनाचा प्रयत्न केला. ही घटना आज, बुधवारी सायंकाळी पाच वाजताच्या सुमारास घडली. याप्रकरणी सलून व्यावसायिकास पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

लॉकडाउनमध्ये शासनाने सलून दुकाने बंद ठेवण्याचे आदेश दिले आहेत. या आदेशाची अवहेलना करून मागील काही दिवसांपासून शहरातील सलून व्यावसायिकांनी दुकाने सुरू केली आहेत. यामुळे नगर परिषदेतर्फे कारवाई करण्यात येत आहे. आज, सायंकाळी पाच वाजताच्या सुमारास नगर परिषदेचे पथक राजीव गांधी चौकात कारवाईसाठी फिरत असताना सलून दुकान सुरू दिसले. या दुकानावर छापा टाकून दंडात्मक कारवाई करण्यासाठी गेले असता, सलून व्यावसायिक प्रमोद केसलकर (वय 35, रा. शुक्रवारी वॉर्ड) याने अंगावर पेट्रोल टाकून आत्मदहनचा प्रयत्न केला.

यावेळी धास्तावलेल्या नगर परिषद पथकातील कर्मचाऱ्यांनी पोलिसांच्या सहकार्याने त्यास ताब्यात घेतल्याने मोठा अनर्थ टाळला. प्रमोद केसलकर स्वाभिमानी संघटनेचे शहरप्रमुख असून, त्यांनी सलून व्यवसाय उभारला आहे. लॉकडाऊनमुळे दुकान बंद असल्याने महिन्याकाठी 20 हजार रुपये दुकान भाडे व कारागिरांचा पगार देणे अडचणीचे झाले होते.
गेल्या तीन महिन्यांपासून लॉकडाऊन असल्याने सर्वच व्यवसाय ठप्प होते. परंतु जून महिना उजाडताच लॉकडाऊनमध्ये काही प्रमाणात शिथिलता देण्यात आली. परंतु सलून व्यवसायात संसर्गाचा धोका अधिक असल्याने या व्यावसायिकांना अद्याप परवानगी मिळालेली नाही. परंतु उदरनिर्वाहाचे एकमेव साधन बऱ्याच काळापासून बंद असल्याने पोट भरायचे कसे असा एकच प्रश्‍न असल्याने व्यावसायिक चिंतित आहेत. त्यातूनच हे टोकाचे पाऊल उचलल्याचे सांगितले जाते.

कोरोना ब्रेकिंग : विदर्भात रुग्णांची वाढ थांबता थांबेना, एका दिवशी वाढले इतके रुग्ण

जिल्हाधिकाऱ्यांना चारदा दिले निवेदन

उदरनिर्वाहाचे एकमेव साधन बंद असल्याने जगायचे कसे हा एकमेव प्रश्‍न असल्याने व्यावसायिकांनी सलून व पानटपरी, ऑटो सुरू करण्यासंदर्भात जिल्हाधिकाऱ्यांना मागील आठवड्याभरापासून चारदा निवेदन दिले. मात्र, या निवेदनाची दखल घेण्यात आली नाही. मागील अडीच महिन्यांपासून सतत दुकाने बंद असल्याने सलून व्यावसायिकांवर आर्थिक संकट कोसळले आहे. यामुळे त्यांनी टोकाची भूमिका घेतल्याची माहिती आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com