अमरावती : आजीसोबत राहणाऱ्या अल्पवयीन मुलीवर तिच्या एका जवळच्या नातेवाइकाने वाईट नजर ठेवून बळजबरी करण्याचा प्रयत्न केला.
तर अन्य दुसऱ्या घटनेत विद्यार्थिनीचा पाठलाग करून पालकांना धमकी देण्यात आली. गाडगेनगर ठाण्याच्या हद्दीत या घटना घडल्या. पीडित मुलगी ही घरी एकटी असताना संशयित व्यक्तीने तिच्या घरी जाऊन जवळीक साधण्याचा प्रयत्न केला. तिच्याशी बळजबरीचाही प्रयत्न करण्यात आला.