esakal | मुलाच्या खांद्यावर बंदूक ठेवून निशाण्याचा प्रयत्‍न
sakal

बोलून बातमी शोधा

vardha

मुलाच्या खांद्यावर बंदूक ठेवून निशाण्याचा प्रयत्‍न

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

वर्धा : गत आठवड्यात पंकज तडस याने त्याचा पत्नीला त्रास देत मारहाण केल्याची तक्रार पोलिस व महानिरीक्षकांकडे करण्यात आली. पती-पत्नीतील वाद मिटविण्यापेक्षा काहींनी मुलाच्या खांद्यावर बंदूक ठेऊन खासदार असलेल्या वडीलांना निशाणा करण्याचा प्रयत्न केल्याचे मत खासदार रामदास तडस यांनी पत्रकार परिषदेत व्यक्त केली.

यावेळी त्यानी विविध दस्तऐवज दाखवत मुलाला दोन वर्षांपूर्वीच आपल्या संपत्तीतून बेदखल करून त्याच्याशी सबंध तोडल्याचे दाखले दिले. शिवाय त्याने यापूर्वी केलेल्या विवाहसह आता केलेल्या विवाहाशी दूरपर्यंत सबंध नसल्याचे सांगितले. पंकज तडस याच्याशी कोणताही संबंध नसल्याने त्याने केलेल्या कृत्याचा व नंतर घडणार्!या घटनांशी आपला सबंध नसल्‍याचे जाहीर केले.

हेही वाचा: Vidarbha : जिल्हा मध्यवर्ती बँकेत ‘१०५’वरून पुन्हा वादंग

आता पंकज आणि पूजा यांचा विवाह झाला असून त्‍यांनी सुखावे नांदावे, तसेच या पती-पत्नीतील वाद चव्हाट्यावर आणणार्!यांनी त्‍यांना मदत करावी, असे आवाहनही त्‍यांनी यावेळी केले. पंकज आपल्‍या पत्नीचा सांभाळ करण्यास सक्षम असून त्याला वडीलांचा कुठल्‍याही आधाराची गरज नसल्‍याचेही ते म्‍हणाले.

या प्रकरणाशी माझा कुठलाही संबंध नसतांना काही राजकीय नेत्‍यांसह स्थानिक विरोधकांनी मला गोवण्याचा प्रयत्‍न केला. आता लग्नाचा घेतलेला निर्णय पंकजचा स्वतःचा असून यानंतर त्‍याच्याहातून घडणार्!या चुकीला पाठींबा नाही.

loading image
go to top