esakal | Vidarbha : जिल्हा मध्यवर्ती बँकेत ‘१०५’वरून पुन्हा वादंग
sakal

बोलून बातमी शोधा

yavatmal

Vidarbha : जिल्हा मध्यवर्ती बँकेत ‘१०५’वरून पुन्हा वादंग

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

यवतमाळ : जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेत अध्यक्ष तसेच संचालकांत सुरू असलेल्या मतभेदावर गेल्या वेळी पडदा पडला असला, तरी अंतर्गत मतभेद कायम आहेत. १०५ पदांची रखडलेली भरतीप्रक्रिया पूर्ण झाली. त्यानंतर मान्यतेसाठी हा विषय गुरुवारी (ता. ९) संचालक मंडळांच्या बैठकीत ठेवला. भरतीप्रक्रियेसंदर्भात संचालकांची मान्यता घेतली नाही, तर आता मान्यता कशाला, असे म्हणत मान्यतेचा विषय संचालकांनी फेटाळला. ११ संचालकांनी तसे पत्र दिले. त्यामुळे जिल्हा बँकेतील अंतर्गत धुसफूस कायम असल्याचे दिसून येत आहे.

जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या निर्णयात संचालकांना विश्‍वासात घेतले जात नसल्याचा आक्षेप यापूर्वीच संचालकांनी घेतला होता. त्यामुळेच राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेसच्या संचालकांनी उघडपणे भूमिका घेतली होती. काही मुद्यांवरून १५ संचालकांनी अध्यक्षांना पत्र दिले होते. त्यावेळी बँकेतील १०५ पदांची नोकरभरती, स्वीकृत संचालक तसेच बोरी येथील शेतकरी सहकारी सूतगिरणीला कर्ज मंजूर प्रकरणावरून मतभेद होते.

हेही वाचा: राज्याने केले निवृत्त ; केंद्राने पुन्हा सेवेत बोलावले!

नेत्यांनी अध्यक्ष तसेच संचालकांत वाढलेले मतभेद कमी करण्यासाठी पुढाकार घेतला. बँकेच्या राजकारणात पहिल्यांदाच नेत्यांना मध्यस्थी करण्याची वेळ आली होती. त्यानंतर सर्व व्यवस्थित सुरू असल्याचे दिसत असले, तरी अजूनही अंतर्गत हवेदावे सुरूच आहेत. १०५ भरतीप्रक्रियेतील उमेदवारांच्या नियुक्तीला मान्यता देण्यासाठी गुरुवारी झालेल्या संचालक मंडळांच्या बैठकीत विषय ठेवला होता. या विषयाला संचालकांनी फेटाळले. नियुक्ती देताना संचालक मंडळाची मान्यता घेतली नसल्याचा आक्षेप ११ संचालकांचा आहे. त्यामुळे भरतीप्रक्रियेवरुन पुन्हा वादंग उभे राहण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.

४२ जागांची भरतीप्रक्रिया

काही वर्षांपासून १०५ जागांच्या भरतीप्रक्रियेचा विषय काही महिन्यापूर्वी संपला. तरी काही मुद्यांवरून अजूनही मतभेद आहेत. यात आता तज्ज्ञ संचालक स्वीकृत संचालकांचा विषय पुन्हा ऐरणीवर आला आहे. शिवाय ४१ जागांची भरतीप्रक्रियाही सुरू झाली आहे. दोन महत्त्वाच्या घडामोडी जिल्हा बँकेत होणार असल्याने संचालक काय भूमिका घेतात यावर बँकेतील राजकारण अवलंबून आहे.

loading image
go to top